BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑग, २०२२

भीमा नदीच्या पातळीत आणखी वाढ होणार !

 



पंढरपूर : गेल्या चार पाच दिवसांपासून भीमा नदीला पूर आलेला असून धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात पुन्हा वाढ केली असल्याचे भीमा नदीच्या पातळीत आणखी वाढ होत आहे. धरणातील विसर्ग रात्री पुन्हा वाढविण्यात आला आहे. 


धरण पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे विविध धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणातून विसर्ग सोडला जात आहे. भीमा नदीत वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होत आहे. पंढरपूर तालुक्यातील सर्व बंधारे हे आधीच पाण्याखाली गेले असून त्यापूर्वी जुना दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे. चंद्रभागेतील मादिरेही पाण्याखाली गेलेली असून मंगळवेढा तालुक्यात देखील अशीच परिस्थिती दिसत आहे. पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकांनाही धोका निर्माण झाला असून शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडू लागला आहे. भीमा नदीचा (Bhima river flood)  पूर ओसरण्याची प्रतीक्षा असतानाच आता विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली असून भीमा नदीची पातळी आणखी वाढणार आहे. 


पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग मंदावल्याने उजनी धरणात येत असलेले पाणी कमी झाले आहे. सद्या उजनी जलाशयात ३४ हजार ९३४ क्युसेक्स पाणी येत आहे तरी उजनी धरणातून ६० हजार क्युसेक्स विसर्ग भीमा नदीत सोडला जात आहे. वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरूच आहे. वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज पाहते तीन वाजता वीर धरणाचा विसर्ग काल १५ हजार होता तो पहाटे वाढविण्यात आला असून ३२ हजार ९०० क्युसेक्स करण्यात आला आहे. खडकवासला धरणांतून (Khadakwasala Dam)  सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील वाढ करण्यात आली आहे. १३ हजार क्युसेक्सवरून हा विसर्ग १८ हजार करण्यात आला आहे. हा विसर्ग उजनी धरणात येतो त्यामुळे ही आवक उजनी धरणात येत आहे. 


वीर धरणातून वाढविण्यात आलेल्या विसर्गामुळे भीमा नदीची पातळी पुन्हा वाढणार असून आज पंढरपूर येथे चंद्रभागेत ७५ हजार ३९७  क्युसेक्स पाणी आहे. वीरचा वाढवलेला विसर्ग पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर चंद्रभागेतील पाणी आणखी वाढणार आहे. नदीच्या पाण्याची पातळी किंचित कमी झाली असतानाच वीर धरणाच्या विसर्गामुळे पुन्हा भीमा नदी पातळीत वाढ होणार आहे. (Bhima river level will rise further, increase in discharge of Veer Dam) नदी काठावरील नागरिक, शेतकरी यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासन करीत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून सद्या तरी महापुराचा धोका टळलेला असल्याचे दिसत आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !