BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑग, २०२२

पत्नीला रेल्वेखाली ढकलून पतीने काढला पळ !

 



शोध न्यूज : पतीच्या क्रूरतेचे मोठे उदाहरण समोर आली असून आपल्या पत्नीला रेल्वेखाली ढकलून पतीने पाल काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

 
पती पत्नीत वाद  होतात, भांडण होतात पण ती तेवढ्यापुरती असतात. अनेक घटनात पती आपल्या पत्नीशी अत्यंत क्रूर वर्तन करीत असल्याच्या घटना देखील समोर येत असतात पण वसईच्या रेल्वे स्टेशनवरील घटनेने  पत्नीचा नव्हे तर मानवतेचाच खून केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. माणूस किती क्रूर होऊ शकतो याचेच हे मोठे उदाहरण असून ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे आणि त्यामुळे घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांसमोर आले आहे. एका पतीने चक्क आपल्या झोपेत असलेल्या पत्नीला रेल्वेखाली ढकलून दिले आहे. दोन लहान मुले आणि पत्नी रेल्वे स्थानकावर झोपलेली असताना अचानक झोपेतील पत्नीला उठवून क्षणार्धात रेल्वेच्या खाली ढकलून देण्यात आले आहे. 


वसई रोड रेल्वे स्टेशनवर एक कुटुंब रात्रीच्या वेळेस फलाट क्रमांक पाच वर झोपले होते. पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले होती. हे कुटुंब कोठून आले होते आणि कुठे जाणार होते याचा काहीच अंदाज नव्हता. पहाटेच्या वेळेस मात्र पतीने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीला उठवले. या स्थानकावर न थांबणारी एक रेल्वे येत होती याचा अंदाज घेत त्याने पत्नीला उठवले आणि काही क्षणात रेल्वे आली. राक्षसी पतीने क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे अगदी जवळ येताच पत्नीला फलाटावरून रेलेपुढे ढकलून दिले. पत्नीला ढकलताच रेल्वेने तिचे तुकडे केले. घाईघाईने पतीने झोपलेल्या आपल्या दोन मुलांना उठवले आणि त्यांना घेवून तो तेथून वेगाने पसार झाला. पहाटेच्या वेळी घडलेली ही घटना कुणीच पहिली नव्हती. मृत महिलेची ओळख देखील पटत नव्हती आणि हे कसे घडले याचाही काही अंदाज येत नव्हता.   लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पहिले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार चित्रित झाल्याचे पाहून धक्का बसला.

 
पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञात पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून या आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे. दोन लहान मुले असलेल्या आईचा आणि आपल्या पत्नीचा झोपेत अशा प्रकारे खून करण्याचा हा प्रकार हादरवून सोडणारा ठरला आहे. सात जन्माच्या सोबतीची शपथ घेणारा पती एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीची हत्या करतो हे अत्यंत थरारक आहे. (The husband pushed the wife under the train and ran away) अत्यंत वेगाने धावत असलेल्या रेल्वेसमोर पत्नीला ढकलून आरोपीने पळ काढला आणि झोपेत असलेल्या पत्नीचे रेल्वेने तुकडे तुकडे केले. अत्यंत विदारक आणि क्रूरतेचा कळस केलेली ही घटना घडली असून माणुसकीचाच हा खून झाल्याचे दिसत आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !