BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑग, २०२२

राग कधीकधी असाही अंगलट येतो !


"राग आणि भीक माग" अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. माणूस रागाने काही करायला जातो आणि त्याच्याच अंगलट येते असे अनेकदा अनुभवाला येते. असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून एका व्यक्तीला आलेला थोडासा राग त्याच्या जीवावर उठला आहे. 


एकदा राग आला की माणूस रागाच्या भरात काहीही करतो, राग शांत झाला की त्याला पश्चातापही होतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. भांडण सुरु झाले की माणूस काय करील ते सांगता येत नाही पण नंतर मात्र आपण चुकीचे केले असे त्याला वाटून जाते. व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीला मात्र नंतर काही वाटूनही उपयोग नव्हता. त्याच्या रागाने त्याचे जे व्हायचे ते होऊन गेले होते. रागाचा आणि भांडणाचा हा व्हिडीओ असला तरी लोक मजेने तो पहात आहेत आणि रागाचा परिणाम काय होवू शकतो हे देखील अनुभवत आहेत. कितीही राग आला तरी काही कंट्रोल असले पाहिजे हेच हा व्हिडीओ सांगताना दिसत आहे. 


अलीकडे कुठल्या घटनेचे व्हिडीओ चित्रित होतील हे सांगता येत नाही. अपघात होतानाचे अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात तसे चोराची हातचलाखी दाखविणारे व्हिडीओ देखील व्हायरल ( viral video)  होत असतात. हा मात्र एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक याला मोठ्या गमतीने पहात आहेत. वरच्या मजल्यावरून एक व्यक्ती खालच्या व्यक्तीला भांडत आहे, ही व्यक्ती बरीच संतापली असल्याचे त्याच्या एकूण कृतीवरून दिसत आहे. या व्यक्तीला एवढा राग आला आहे की तो घरातल्या वस्तू फेकून मारीत आहे. हाती लागेल ते फेकून मारण्याचा त्याचा मूड दिसत आहे. तो घरात जातो आणि आतून काही वस्तू घेवून येतो. त्या वस्तू तो खालच्या व्यक्तीला फेकून मारतो. (Angry man  falls from gallery below)





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !