BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑग, २०२२

थरारक ! मुलाचा पाय विषारी नागावर पडणार एवढ्यात .........

 



शोध न्यूज : खतरनाक, काळजाचे पाणी असे शब्द कधी वापरले जातात याचा ज्वलंत अनुभव देणारी एक घटना समोर आली असून त्याच्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 


माणूस असो, मुके प्राणी असो, आपल्या अपत्याला आई किती काळजीपूर्वक सांभाळत असते हे वारंवार अनुभवला येत असते. छोटेसे प्राणी देखील आपल्या पिलाला वाचविण्यासाठी मोठ्या शक्तीशी सामना करते याचे अनेक व्हिडीओ आपण पाहत असतो. आई ही एक वेगळीच शक्ती असून आपला जीव धोक्यात घालते पण सर्वशक्तीनिशी ती आपल्या लेकराला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असते. आईचे आपल्या मुलावर किती प्रेम असते आणि त्यासाठी ती आपला जीव देखील धोक्यात घालते हे कुणी कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. अशाच एका माउलीने विषारी नागापासून आपल्या लहान मुलाला वाचवले आहे आणि त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकतो आणि पुन्हा पुन्हा हा प्रसंग पहिला जातो. 


अंगावर काटा आणणारा हा प्रसंग असून मुलाचा जीव किती थोडक्यात आणि आईच्या धाडसाने वाचला आहे हे दिसते. 'देव तरी त्याला कोण मारी' अशी एक प्रचलित म्हण आहे. हा व्हिडीओ पहिला की असाच अनुभव येतो आणि या म्हणीचा प्रत्यय डोळ्याने पाहायला मिळतो. संकट दिसलं की विषारी कोब्रा नाग हल्ला केल्याशिवाय सोडत नाही. या घटनेत मात्र लहान मुलाचा पाय नागाच्या अंगावर पडू लागताच कोब्रा मागे सरकला आणि पुन्हा त्याने हल्ला केला पण तोपर्यंत आईने धाव घेवून मुलाला वाचवले आहे. (Horrible! A child's foot will fall on a poisonous snake) लांबलचक आणि खवळलेला नाग मुलाच्या अंगावर धावून जात असतानाच आईनेही धाडसाने पुढे पाऊल टाकले आणि आपल्या लाडक्याला नागाच्या तावडीतून वाचवले आहे.  


लहानगा मुलगा घराच्या समोर छोट्या पायरीवरून उतरू लागला पण पायरीच्या खालच्या बाजूला भला मोठा विषारी नाग होता. मुलगा अत्यंत जवळ होता पण कट्टा आणि पायरी यामुळे त्याला नागाचे आस्तित्व जाणवले देखील नाही. तो पायरी उतरताना थेट नागावर पाय देणार तोच नागाने संकट ओळखून मागे जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र तो नाग चवताळून पुढे आला आणि मुलाला दंश करणार एवढ्यात आईने या मुलाला बाजूला घेतले आणि नागोबा सरळ आपल्या वाटेने निघून गेले. हा अत्यंत खतरनाक प्रसंग चित्रित झाला असून तो हजारो लोकांनी पहिला आहे.  तुम्हीही पहा हा व्हिडीओ ..... 




साप, नाग म्हटलं की अंगावर काटा येतो आणि दिसला साप की त्याला मारायला माणूस पुढे धावतो. पण हे विषारी प्राणी त्याला डिवचल्याशिवाय तो दंश करीत नाही हे देखील यातून दिसून आले आहे. नागाच्या अंगावर पाय पडण्याच्या क्षणीच हा नाग चपळाईने मागे सरकला आहे. तो मागे गेला नसता तर मुलाचा पाय नागाच्या अंगावर पडला असता आणि नागाने त्याला दंश केलाच असता. पण सुदैवाने असे काही घडले नाही ' ऍनिमल रेस्क्यू इंडिया' या यु ट्यूब अकाउंटने हा व्हिडीव शेअर केला आहे आणि त्याला प्रचंड लाईक मिळत आहेत.


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !