BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑग, २०२२

होय, आम्हीच केलाय खून ! आरोपींची कबुली !




शोध न्यूज : होय, आम्हीच लखन गांडुळे याचा खून केलाय!' अशी स्पष्ट कबुली आरोपींनी दिली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे तर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.

वाखरी हद्दीत भंडीशेगाव येथील लखन गांडुळे या पंचवीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला आणि मृतदेह पाहताच हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसून आले होते. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी वेळ  न दवडता या घटनेच्या तपासाला वेग दिला आणि काही तासात पोलिसांनी दोन संशयितांच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणले. ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ते युवराज सातपुते आणि तुषार मेटकरी हे मयत लखन गांडुळे याचे मित्र होते आणि या मित्रांनीच आपल्या एका मित्राचा घात केला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु सत्य आपोआप समोर येते तसे घडले आणि पोलिसांनी उजनी कामगिरी करीत सहा तासात या संशयित आरोपींना पकडले. 

 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पंढरपूर येथील युवराज सातपुते आणि तुषार मेटकरी  या दोघा संशयिताकडे पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी सुरु केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. आपण लखन गांडुळे याची हत्या केली असल्याचे त्यांनी मान्य करून आधीपासूनचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. सदरचा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याची माहिती पुढे येवू लागली असून संशयित आरोपी आणि मयत लखन गांडुळे यांच्यात वाद सुरूच होता. या वादातून दोघांनी त्याची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याला विहिरीत टाकून देण्यात आले.


सदर आरोपींनी गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांना सांगितले असून या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता पोलिसांच्या तपासाला आणखी गती येणार असून या खुनामागील संपूर्ण रहस्य पोलीस तपासात उघड होणार आहे. (Pandharpur Murder, Confession of accused) अवघ्या सहा तासांच्या कालावधीत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या त्यामुळे नागरीकातून देखील पोलिसांना धन्यवाद देण्यात येत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी अत्यंत तातडीने आणि जलदगतीने या गुन्ह्याचा तपास सुरु केला, तपासासाठी तीन पथके देखील नेमली होती त्यामुळे काही तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. 


                                                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !