BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑग, २०२२

सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय ? अजीतदादा संतापले !



शोध न्यूज : सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय ? होय, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अत्यंत संतापून हा सवाल सत्तेतील लोकांना केला आहे.

 
राज्यात सत्तांतर झाले, 'एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार' यांनी शिवसेना फोडली आणि भाजपसोबत जाऊन सत्तेची वाटणी केली. शिवसेना फोडून गेलेल्या आमदारांचे आणि शिवसेनेचे सख्य राहिलेले नाही, न्यायालयापासून ते रस्त्यापर्यंत आपसात लढाई सुरु आहे. शिवसेनेतून फुटून गेलेल्या काही मंडळीनी आपले तोंड एवढे मोकळे सोडले आहे की सामान्य माणसाला देखील आता किळस आणि संताप येवू लागला आहे. एकूण राजकारणाची पातळी आधीच खाली गेली असताना शिंदे गटातील काही मंडळीनी ताळतंत्र सोडले आहे, सत्ता मिळवली म्हणजे काहीही आणि कसेही बोलण्याचा परवानाच मिळाला असावा असे बेताल बोल सद्या बोलले जात आहेत आणि यावरच विरोधी पक्ष नेते संतापले आणि 'मस्ती आली काय' ? असा सणसणीत सवालच त्यांनी विचारला आहे. 


जाहीर सभेत आणि पत्रकारांशी बोलताना हा अनेकांचा तोल सुटला असल्याचे दिसत असताना काल दोन घटना घडल्या. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केली तर दुसरीकडे आ. प्रकाश सुर्वे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थेट ठोकून काढा, हात तोडायला जमले नाही तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी जामीन मिळवून देतो' अशा प्रकारचे आदेशच देवून टाकले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रचंड संताप व्यक्त करीत, "मस्ती आलीय काय"? असा सवाल विचारला आहे. (
Ajit Pawar was angry with the government)  शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अशा प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

  

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून परंपरेप्रमाणे सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना चहापानाचे निमंतन दिले होते, विरोधी पक्षांनी मात्र या चहापाण्यावर बहिष्कार टाकला आणि त्याचे कारण सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाकडून अधिवेशनात उपस्थित करण्यात येणार असलेल्या मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी त्यांनी आ. संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्यास केलेल्या मारहाणीचा उल्लेख करीत नव्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात नवे सरकार येवून काही दिवसच झाले आहेत आणि यांच्यातील काही आमदार राज्यात संघर्ष पेटावा अशी विधाने करीत आहेत. 'शिवसैनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात तोड, ते नाही जमले तर तंगडी तोडा, अरे ला कारे म्हणा, कोथळा काढा' अशी भाषा वापरली जात आहे. काय ही पध्दत ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला हे पटते काय ? असा प्रश्न त्यांनी विचारला.  


अजितदादा संतापले !

शिंदे गटातील आ. बांगर आणि आ. सुर्वे यांच्या विधानांचा आणि कृतीचा संदर्भ देत अजितदादा  संतापून म्हणाले, " हे आमदार कायदा हातात घ्यायला लागलेत, स्वत:ला कोण समजता तुम्ही ? सरकार आले म्हणजे मस्ती आली का? नियमांपेक्षा कुणी मोठा नाही. कायदे, नियम सर्वाना सारखेच आहेत मग तो कुणीही असो,  या सरकारचे अजून सुरुवात नाही झाली तोवर एवढी मस्ती आली आहे, यांना कुणी थांबवत देखील नाही? महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही अशी भाषा वापरत असाल तर गावागावात काय परिस्थिती निर्माण होईल? सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे "  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !