BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑग, २०२२

पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला मोठा अपघात !






शोध न्यूज : पंढरपूरला देवदर्शन घेण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला मोठा अपघात झाला असून या अपघातात ३० वारकरी जखमी झाले असून ९ जणांची प्रकृती गंभीर आहे.


गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर यात्रेसाठी अथवा दर्शनासाठी पंढरीकडे येत असलेल्या आणि दर्शन घेवून परत आपल्या गावी जात असलेल्या भाविकांच्या वाहनांना मोठे अपघात होऊन अनेक प्राण गेलेले आहेत तर कित्येक जखमी झाले आहेत. अपघाताचे प्रमाण वाढलेले असतानाच दर्शनासाठी किंवा पंढरपूर वारीसाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांना अधिक प्रमाणात अपघात होत आहेत. अनेक भाविक मिळून एखादे खाजगी वाहन भाड्याने घेऊन भाविक पंढरीला जात असतात. यात ट्रक, टेंपो,ट्रॅक्टर अशा विविध वाहनांचा समावेश असतो. सर्वात मिळून हे भाडोत्री वाहन कमी खर्चिक पडते म्हणून भाविकांचा अशा वाहनातून प्रवास करण्याकडे अधिक कल असतो. गेल्या दोन वर्षात भाविकांच्या अशाच वाहनांना अपघात झालेले आहेत आणि अनेक भाविक अशा अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत. 


पंढरपूर - मिरज हा रस्ता रुंद आणि सिमेंट काँक्रीटचा तयार करण्यात आल्यापासून या मार्गावरील वाहतूक अत्यंत गतिमान झाली असून या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या दिंडीतही अपघात झाले आहेत आणि वाहने घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना देखील मोठ्या अपघाताचा सामना करावा लागला आहे. याच रस्त्यावर पुन्हा एकदा विठ्ठलवाडी जवळ अपघात होऊन ३० भाविक जखमी झाले असून ९ भाविकांची प्रकृती गंभीर आहे. एका ट्रकमधून ५० भाविक पंढरीला दर्शनासाठी निघाले होते पण अर्ध्या रस्त्यातच त्यांचा अपघात झाला आणि पंढरपूरऐवजी दवाखान्यात जाऊन पडावे लागले आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी येथून ट्रक घेवून हे वारकरी पंढरपूरला निघालेले होते.


मिरज - पंढरपूर मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात हा ट्रक भरधाव वेगात आलेला असताना समोर असलेल्या एस टी बसवर जाऊन आदळणार म्हणून जोराचा ब्रेक लावला. त्यामुळे हा ट्रक अनियंत्रित होत पलटी झाला. रस्त्यावर मध्येच काही ठिकाणी काम सुरु आहे आणि त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांचा अचानक अंदाज ट्रक चालकाला न आल्याने अपघाताची ही घटना घडली असल्याचे वारकरी सांगत आहेत. ट्रकमध्ये असलेल्या पन्नास भाविकांपैकी ३० भाविक जखमी झाले आणि यातील ९ वारकरी गंभीर स्वरूपाचे जखमी झाले आहेत. त्यांना कवठे महांकाळ येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरु केले आहेत. नऊ भाविकांची प्रकृती चिंताजनक अवस्थेत आहे. 


भरधाव वेगात निघालेला हा ट्रक समोरच्या एस टी बसवर आदळणार याची जाणीव ट्रक चालकाला झाली आणि त्यामुळे त्याने तातडीने एकदम जोराचा ब्रेक दाबला पण यामुळेच अपघाताची वेळ आली. मोठा अपघात होताच गावकरी घटनास्थळी धावले आणि मदतकार्य सुरु केले. दरम्यान कवठे महांकाळ पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. (
A big accident  devotee's truck on Miraj Pandharpur road ) गावकरी आणि पोलीस यांनी मिळून जखमी वारकऱ्यांना मदत केली तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठवले.  


"शोध न्यूज" ग्रुपमध्ये सहभागी 

होण्यासाठी येथे क्लिक करा !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !