"काय झाडी, काय डोंगार, काय हाटील .......ओक्के " हे सांगोल्याच्या आमदार शहाजीबापू पाटील यांचे फोनवरील वाक्य भलतेच व्हायरल झाले आणि गाजलेही, पण आता असेच एक वाक्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आणि शहाजीबापू पाटलांना जबर टोला देखील लगावला आहे.
शिवसेनेतून फुटून अर्थात शिवसेनेशी गद्दारी करून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुरत आणि तेथून गुवाहाटी गाठली. गद्दारांच्या कृतीवर महाराष्ट्र संतापला असताना आ. पाटील मात्र गुवाहाटीचे पर्यटन करीत होते. आपल्या एका सहकाऱ्याला फोनवर बोलताना त्यांनी उच्च्चारलेले "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील .......ओक्के " हे वाक्य भलतेच व्हायरल झाले. देशभर याची चर्चा तर झालीच पण या वाक्यावर गाणी देखील आली. त्यानंतर मात्र हे वाक्य वारंवार उच्चारले जाऊ लागले आणि पांचट होऊन गेले. आ. शहाजीबापू यांनी पुन्हा पुन्हा या वाक्याचा उच्चार सुरु ठेवला तेंव्हा मात्र त्याची चव निघून गेली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पुन्हा हे वाक्य वेगळ्या अर्थाने उच्चारले आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना जोरदार चपराक लगावली आहे.
उद्धव ठाकरे यांनी या वाक्याचा संदर्भ देत 'महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात ?" असा सणसणीत प्रश्न विचारला आहे. झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही काय? किती सुंदर आहे महाराष्ट्र ! ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्रातील या निसर्गाची भुरळ पडत नाही पण गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात ? महाराष्ट्राच्या ज्या मातीत जन्माला आला त्या मातीची ओढ तुम्हाला का नाही ? या मातीत वैभव तुम्हाला कसे दिसले नाही हेच मला कळत नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आपण स्वत: एक कलाकार असून आपल्या फोटो ग्राफिवर टीका करण्यात आली होती. चेष्टा देखील करण्यात आली होती. आपण गडकिल्ल्यांची आणि पंढरीच्या वारीची फोटोग्राफी केली होती. मी शहरातील आहे पण तुम्ही तर ग्रामीण भागातले, तरी देखील तुम्हाला महाराष्ट्राचे सौंदर्य कसे दिसत नाही, या महाराष्ट्राच्या सौंदर्याचे वर्णन कधी करावे असे का वाटले नाही ? महाराष्ट्र सोडून थेट गुवाहाटी ? गुवाहाटीला मी वाईट म्हणत नाही कारण प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो, पण आपल्या मातीसाठी हे काय करणार ? असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांनी शहाजी पाटील यांना टोला लगावला आहे. (Uddhav Thackeray said, kay jhadi, kay dongaar )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !