BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जुलै, २०२२

अल्पवयीन मूकबधीर बालिकेवर बलात्कार !

 



सोलापूर : खाऊ देण्याचे नाटक करीत एका अल्पवयीन आणि मूकबधिर असलेल्या बालिकेस दुकानात नेतो म्हणून घेवून गेला आणि तिच्याबर अत्याचार केल्याची अत्यंत निंद्य घटना सोलापूर शहरात उघडकीस आली आहे. 


कायदे कितीही कडक केले तरी वासनांध कोवळ्या बालिकांना देखील वासनेची शिकार बनवत असल्याच्या घटना थांबताना दिसत नाही. समाजाची पातळी एवढी खाली गेली आहे की विश्वास ठेवायचा तरी कुणावर? असा सवाल सतत उपस्थित होत असतो. सोलापूर येथील अक्कलकोट रोड परिसरातील एका भागात घडलेली घटना ऐकून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. आपल्या आजीजवळ ही बालिका थांबलेली असताना अजीज उर्फ अहमद गुलाम दस्तगीर शेख नावाचा ४५ वर्षे वयाचा नराधम घरी आला. काही वेळ तो या घरीच थांबला आणि नंतर या अल्पवयीन मुकबधीर बालिकेस खाऊ आणण्याचे नाटक करू लागला. या बालिकेला दुकानात घेवून जाऊन तिला खाऊ घेवून देतो अशी बतावणी त्याने आजीला केली. आजीने मात्र मुलीला बाहेर नेण्यास विरोध दर्शवला. पाच मिनिटात परत घेवून येथो म्हणून आजीच्या विरोधानंतर देखील त्याने बालिकेला बाहेर नेले आणि काही वेळात आणून घराच्या जवळ सोडले. 


बालिकेला घेवून गेल्यानंतर दीड तासांचा वेळ गेल्याने आजी चिंतेत होतीच. पाच मिनिटात येतो म्हणणारा नराधम दीड तास आला नाही त्यामुळे काळजी करण्याची परिस्थिती निर्माण झालेलीच होती. जेंव्हा तो बालिकेला घेवून आला तेंव्हा घरात न येत मुलीला बाहेरच सोडून पसार झाला. अल्पवयीन आणि मुकबधीर बालिका रडत होती. रडत रडतच तिने इशारा करून एकूण घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला. बालिकेचे वडील कामानिमित्त बाहेर गेलेले होते, सायंकाळी ते परत आल्यावर मुलीच्या आजीने त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर मात्र बालिकेच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली आणि साईनगर येथे राहणाऱ्या अजीज शेख याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


या घटनेची माहिती परिसरात समजल्यानंतर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ओळखीच्या माणसावर देखील विश्वास कसा ठेवायचा हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. (Rape of a minor deaf-mute-gairl at Solapur) मुकबधीर असल्याचा गैरफायदा घेत नराधम अजीज शेख याने या मुलीशी दुष्कर्म केले असून पोलीस आता अधिक तपास करीत आहेत. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !