BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जुलै, २०२२

राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द, चिन्हही गोठवले !

 



महाराष्ट्रातील दहा राजकीय पक्षांसह देशातील १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली असून पक्षाचे निवडणूक चिन्ह देखील गोठविण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना हा पक्ष कुणाचा ? यावर आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले परंतु हा विषय सर्वोच्च न्यायालयात लटकलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिंदे - फडणवीस सरकारचे भवितव्य अबलंबून असले तरी शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गोटात दाखल झाले आहेत. राज्यात देखील शिवसेना फोडण्याचे काम वेगाने सुरु असल्याचे दिसत असून शिंदे गटाने थेट शिवसेनेवरच दावा ठोकला आहे. आपण आजही शिवसेनेतच असून आपला गट म्हणजेच शिवसेना आहे असे शिंदे गटाचे म्हणणे आहे आणि हा विषय निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. दोन्ही गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह देखील गोठवले जाऊ शकते असा जाणकारांचा अंदाज आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने देशातील १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली असून यात महाराष्ट्रातील दहा राजकीय पक्षांचा समावेश आहे.

 
राजकीय पक्षांची मान्यता रद्द करतानाच निवडणूक आयोगाने त्या पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील गोठविण्यात आले आहे.  यात दिल्लीच्या ३३ तर उत्तर प्रदेशातील १० राजकीय पक्षांचा समावेश आहे . आसाम - ९, जम्मू काश्मीर - ८, बिहार - ६, आंध्र प्रदेश - ५, ओरिसा - ३, गुजरात - ३, केरळ- ३, मध्य प्रदेश - ३, पश्चिम बंगाल - २, मिझोरम - २, कर्नाटक - २, हरियाणा - २, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड, मेघालय आणि उत्तराखंड या राज्यातील प्रत्येकी  १ अशा १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करून त्यांचे निवडणूक चिन्ह गोठविण्यात आले आहे. (Cancellation of recognition of political parties) यात महाराष्ट्र राज्यातील दहा पक्षांचा समावेश आहे. 


महाराष्ट्रातील दहा पक्ष 
भारतीय आवाज पार्टी, वॉर वेतरणा पार्टी, जनादेश पक्ष मुंबई, पीपल्स पॉवर पार्टी, राष्ट्रीय लोक जागृती पार्टी, शेतकरी विचार दल, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, विदर्भ विकास पार्टी, विदर्भ राज्य पार्टी, न्यूज काँग्रेस अशा महाराष्ट्रातील दहा राजकीय पक्षांचा समावेश आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !