BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जून, २०२२

पंढरपूर तालुक्यातील 'त्या' तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न !

 



वालचंदनगर : पंढरपूर तालुक्यातील तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घटना उघडकीस आल्यानंतर केवळ ४८ तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. 


पंढरपूर तालुक्यातील बादलकोट (करकंब) येथील विकास संभाजी पाखरे या २७ वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह नीरा नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला होता. त्याचे दोन्ही पाय आणि हात रस्सीने बांधलेल्या अवस्थेत होते तर पोटाला एका रस्सीच्या सहाय्याने खांब बांधलेला होता. मृतदेहाची एकूण अवस्था पहिली असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला बांधून पाण्यात फेकून दिले असल्याचे दिसत होते. वालचंदनगर पोलिसांना तशा प्रकारचा संशय होता. तातडीने मृतदेहाची ओळखही पटली होती त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या ४८ तासांच्या आत आरोपी निष्पन्न करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखील दाखल केला आहे. पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथील एका महिलेसह पाच जणांच्या विरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून संबंधित पाच संशयित आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विकास संभाजी पाखरे हा टेंपो मालक होता आणि हा टेंपो तो स्वत: चालवत होता.  बारामती- मंगळवेढा या मार्गावर रोज तो बारामती येथून पशुखाद्याची वाहतूक करीत होता. विकास पाखरे याचे त्याच्या गावातील म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. यातून विकास याचा काटा काढण्याचे कारस्थान शिजले आणि शुक्रवारी १० जून रोजी रात्रीच्या वेळेस विकासचा खून करण्यात आला. त्याचे हात पाय दोरीने सिमेंटच्या खांबाला बांधण्यात आले. (A youth from Pandharpur taluka was found murdered) पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुणे आणि सोलापूर हद्दीवरील कुरवली गावाजवळील नीरा नदीच्या पुलावरून फेकून देण्यात आला. 


मृतदेह पाण्यावर !

 रविवारी म्हणजे घटनेच्या दोन दिवसांनी सकाळी नीरा नदीच्या पात्रात मृतदेह तरंगताना दिसून आला .पुणे- सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मृतदेह पाहण्यासाठी पुलावर मोठी गर्दी केली होती. मृतदेहाबाबत तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. वालचंदनगर पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची त्वरित ओळख पटवली आणि तपास सुरु केला. केवळ ४८ तासात पोलीस संशयित आरोपीपर्यंत पोहोचले. 


पाच जणांना अटक !

विकास पाखरे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. बादलकोट येथल नवनाथ श्रीधर नवले, सचिन श्रीधर नवले, महेंद्र आटोळे, दादा ह्गारे आणि साधना नवले या पाच जणांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांना संशय होता 

मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याची अवस्था पाहता हा खुनाचा प्रकार असावा असा संशय पोलिसांना आला होता आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरु केला होता. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत मृतदेह आढळला असला तरी देखील पोलिसांनी तातडीने मृतदेहाची ओळख पटवली आणि पुढील तपास सुरु केला. अवघ्या ४८ तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !