BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जून, २०२२

उजनी कालव्यात आढळला अनोळखी मृतदेह !

 



मोहोळ : उजनी डाव्या कालव्यात एक अनोळखी मृतदेह आढळून आला असून या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की अन्य काही प्रकार आहे याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. 


मोहोळ तालुक्यातील पेनूर गावच्या हद्दीत उजनी डाव्या कालव्यात धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पेनूर हद्दीत माळी फाटा ते पाटील वस्ती या दरम्यान कालव्यातील लोखंडी पाईपला अडकलेला एक मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. अनोळखी पुरुषाचा हा मृतदेह असून सुमारे ४० ते ४५ वय असलेल्या या मृतदेहाच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि विजार आहे. (Dead-body-found-in-ujani-canal) हा मृतदेह नक्की कुणाचा आहे याबाबत अजून काहीच माहिती मिळाली नाही. 


मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे. सदर व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली आहे याबाबत अधिक माहिती पोलीस तपासात मिळणार आहेच पण परिसरात मात्र चर्चा आणि शंका कुशंका सुरु आहेत. पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह नुकताच नीरा नदीत आढळला असून तो खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कालव्यातील मृतदेहाबाबत देखील पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !