BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जून, २०२२

एस टी चा मोठा महत्वपूर्ण निर्णय !

 



राज्य परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच एकदम मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता तळीराम चालकाला थेट घराचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असून याचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.


कधीकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित मानले जात होते. रत्यावर कुठेही झालेले अपघात हे ट्रक अथवा अन्य खाजगी वाहनांचे दिसत होते पण अलीकडे ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. खाजगी वाहनापेक्षा राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास धोकादायक वाटू लागला आहे. अनेक ठिकाणी आणि अत्यंत भीषण असेही अपघात एस टी बसचे होऊ लागले आहेत. अर्थात अशा अपघातासाठी अनेक कारणे असतात. प्रत्येकवेळी चालकाला जबाबदार धरता येत नाही पण अनेकदा चालकाच्या चुकीने अथवा बेपर्वाईने एस टी अपघात होत असतात. बसमधील प्रवाशांची जबाबदारी चालकावर असली तरी देखील त्यांची बेपर्वाई प्रवाशांना रक्तबंबाळ करते किंवा प्रवाशांचा जीवही घेत असते. क्वचित प्रसंगी बस चालक हा नशेत असल्याच्या काही बाबी यापूर्वीच समोर आल्या आहेत आणि हे सर्वात खतरनाक आहे.


राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता महत्वपूर्ण निर्णय घेतला असून तळीराम बस चालकास थेट बडतर्फ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मद्यपान करून कामावर आलेल्या बस चालकास दुसरी कोणतीही शिक्षा नसून त्याला नोकरीतून कायमचे काढून टाकले जाणार आहे. मद्यपान केलेला चालक असो किंवा वाहक असो, त्याला थेट आणि कायमचे घरी बसविण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने एक नियमावली जारी केली असून चालक, वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करूनच त्याला कामावर पाठविण्यात येणार आहे. ही तपासणी  करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाकडे देण्यात आली आहे. 


कामावर जाणाऱ्या चालकाने मद्यप्राशन केले नाही याची खात्री आणि तपासणी करूनच वाहन परीक्षकाने बस त्यांचा ताब्यात द्यायची आहे. एवढ्यावर हे थांबत नसून वाहतूक नियंत्रकावर देखील जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रकाने चालक, वाहकांना तपासूनच बस स्थानकावरून सोडायची आहे. कुणी चालक, वाहक जर मद्यप्राशन केल्याची शंका असेल ते त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून पुढे त्याच्यावर पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे, शिवाय पुढील कारवाई केली जाणार आहे. (State transport took a big important decision)ही सर्व जबाबदारी आगार व्यवस्थापकांची असणार आहे त्यामुळे कुणी वाहक, चालक यातून सुटणे शक्य नाही. 


बस स्थानकातून बस सुटल्यानंतर चालक, वाहकांनी पुढे प्रवासात मद्यपान केले असले तरी त्याची सुटका होणार नाही कारण प्रत्येक बस स्थानकासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. ज्या आगारात अल्कोहोल तपासणी मशीन आहे तेथे इतर आगराच्याही आलेल्या आणि जाणाऱ्या बसच्या चालक वाहकांची तपासणी करायची आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या रातराणी बसच्या चालक वाहकांची तपासणी करायची आहे आणि त्याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवायची आहे. कुणी चालक अथवा वाहक मद्यप्राशन केलेला आढळल्यास त्याला थेट बदरारीची शिक्षा दिली जाणार आहे. कुठल्याही परिस्थिती तो पुन्हा राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत असणार नाही. तसे आदेशच आगार व्यवस्थापकांना देण्यात आलेले आहेत .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !