BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जून, २०२२

शेतकऱ्याकडून लाच घेताना पंढरीत सापडला लाचखोर !

 


पंढरपूर : ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी शेतकऱ्याकडून लाच घेताना पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.


पोलीस, महसूल विभागाच्या बरोबरीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार अनेकदा चर्चेत असतो. पोलीस आणि महसूल विभागातील अनेक कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी देखील लाच लुचपत प्रतिबंधक विबाह्गाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अलगद अडकताना नेहमीच दिसतात पण आज सार्वजनिक बांधकाम विभागातील एक कर्मचारी केवळ ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेताना सापडला आहे. एका शेतकऱ्याने या लाचखोर कर्मचाऱ्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. तक्रारदार शेतकऱ्याच्या शेताच्या बाजूने नवीन रस्ता जाणार असल्यामुळे या शेतकऱ्याला ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. सदर शेतकऱ्यास ही जमीन बिगरशेती करायची होती त्यासाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अर्ज केला होता. (PWD Employee caught red-handed taking bribes) सदर नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी या कार्यालयातील कर्मचारी भांडार लिपिक चंद्रकांत टोणपे याने स्वत:साठी आणि आपल्या वारीष्ठासाठी तीस हजार रुपयांची मागणी केली होती. 


संबंधित शेतकऱ्याला लाचेची ही रक्कम देणे मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याशी संपर्क साधून आपली तक्रार दिली. सदर तक्रारीनुसार या विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. काल घेतलेले पाच हजार आणि पाच हजार रुपये दे तसेच वारीष्ठाचे वीस हजार रुपये दे अशा प्रकारची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले होते.  त्यामुळे आज या पथकाने सापळा लावला आणि या सापळ्यात सदर कर्मचारी टोणपे हा पाक हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. लाच घेताना सापडताच चंद्रकांत अभिमन्यू टोणपे याच्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.   सदर कारवाई होताच सार्वजनिक विभागात तसेच अन्य शासकीय कार्यालयात देखील प्रचंड खळबळ उडाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !