BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जून, २०२२

आषाढी वारीतही उजनीचे पाणी तापणार !




उजनीचे पाणी लाकडी निंबोडी योजनेला देण्याचा वाद अजूनही थंड झालेला नसून ऐन आषाढीत देखील या पाण्याचा उकळी फुटणार असून लाकडी निंबोडी योजना रद्द करावी अन्यथा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरभैय्या देशमुख यांनी दिला आहे.


उजनी धरणातील पाणी इंदापूर, बारामतीला पळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सतत होत असून सोलापूर जिल्ह्यातून यास विरोध होत आहे. जिल्ह्यातील काही नेते या विषयावर आकमक झाले होते परंतु पुन्हा ते 'शांत' झाल्याचे दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र आंदोलन करीत असून कुठल्याची परिस्थितीत उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजनेसाठी जाऊ दिले जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रखर विरोध केल्यानंतर आता जनहित शेतकरी संघटना देखील आक्रमक झाली असून लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनाच रद्द करावी अशी मागणी या संघटनेने केली आहे.  कुठल्याही परिस्थितीत उजनी धरणाचे पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाऊ दिले जाणार नाही असा पवित्रा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी घेतला आहे. 


प्रहार शेतकरी संघटनेने लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी त्यांच्या घरासमोर ऍटमबॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे तर आता जनहित शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना आषाढीची शासकीय महापूजा करण्यापासून रोखू असा इशारा दिला आहे. (Ujjani water will be heated even in Ashadi Wari)त्यामुळे ऐन आषाढी वारीत उजनीचे पाणी उकळते राहणार असल्याचे स्पष्ट आहे. आमदार, खासदार याना लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिलेले असते, लोकांची सेवा आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम त्यांनी करणे अपेक्षित असते पण दिवसाढवळ्या उजनीचे पाणी पळवले जात आहे, लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प आहेत. अशा लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि उजनी धरण पाणी बचाव संघर्ष चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन देशमुख  यांनी केले आहे. 


हलगी वाजवावी लागेल 
जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत नसतील आणि झोपेचे सोंग घेत असतील तर त्यांना जागे करण्याची गरज आहे, त्यांना जागे करण्यासाठी आता हलगीनाद करावा लागेल असे अतुल खूपसे पाटील यांनी म्हटले आहे तर बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकशाही मार्गाने सरकार ऐकायला तयार नसेल तर त्यासाठी तीव्र आंदोलनाची तयारी असल्याचे देखील घाटणेकर यांनी सांगितले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !