BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२३

वकीलाने केला स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न !

 




शोध न्यूज : मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापू लागला असून, एका वकीलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.


मराठा आरक्षणाची मागणी गेल्या काही वर्षांपासून मराठा बांधव करीत आहेत. त्यासाठी विक्रमी मोर्चे काढण्यात आले. लाखोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र जमले पण एकदाही कायदा सुव्यवस्था धोक्यात आणली गेली नाही. अत्यंत शांतपणे झालेल्या या आंदोलनाची जगभर वाहवा झाली होती. आजवर अशी आंदोलने झाली नव्हती. पण जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे शासनाने केलेल्या आततायी प्रयत्नामुळेच वातावरण बिघडून गेले आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. उपोषण, जाळपोळ, बंद, रास्ता रोको असे सगळेच प्रकार सुरु असतांना आणि सरकारचा निषेध होत असताना, मराठा बांधव आपला जीव देण्याचा देखील प्रयत्न करु लागले आहेत. एका वकीलाने तर जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अंगावर डिझेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची मोठी घटना समोर आली आहे.


मराठा समाजावर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत, मराठा आरक्षण तातडीने मिळावे या मागणीसाठी, ॲड. मारोती भाऊसाहेब वाडेकर या वकीलाने अंगावर डिझेल ओतून, स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडल्याने, आजूबाजूला पोलिसांचा वावर होता त्यामुळे, पोलिसांनी तातडीने धाव घेत हस्तक्षेप केला. पोलीस वेळीच धावल्याने मोठा अनर्थ टळला. (Maratha arkshan ) काही अनुचित घडले असते तर त्याचे भयानक पडसाद राज्यभर उमटले असते. आधीच अडचणीत आलेले सरकार मोठ्या कोंडीत अडकले असते.   एका वकीलाने केलेल्या या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे मोठी खळबळ उडाली आहे.


अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथे गेल्या अकरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती ढासळली असून, अजूनही तोडगा निघताना दिसत नाही. (Lawyer for Maratha reservation tried to set himself on fire) सरकार केवळ वरवरचे उपाय शोधत आहे पण जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. सरकारी भुलभुलैय्याला ते दाद देत नसल्यामुळे सरकारला घाम फुटला असून, या उपोषणाला राज्यातून मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.  


वकील म्हणाले ---

स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करणारे वकील वाडेकर यांनी या घटनेनंतर पुन्हा एक इशारा दिला आहे. मागच्या अकरा दिवसांपासून सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या जीवाचं काही बरे वाईट झाले तर आम्ही काय करायचे ? पोलिसांनी लाठीचार्ज करून वृद्ध आणि महिलांना अमानुष मारहाण केली आहे. त्यांची डोकी फोडली आहेत, आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे पोलिसांवर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपले पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने मदत करायला हवी आहे. मराठा आरक्षणाचा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहोत पण मनोज जरांगे पाटील यांना काही झाले तर महाराष्ट्र असा पेटेल की, त्याला कुणी विझवू शकणार नाही !

lawyer attempt self immolation maratha arakshan





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !