BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जून, २०२२

अवघ्या आठ वर्षाच्या मुलाने घेतली "फाशी" !

 



पुणे : अवघ्या आठ वर्षाच्या मुलाने गळफास लावून स्वत:ला लटकावून घेतले आणि यातच त्याचा प्राण गेल्याची अंत्यंत चिंताजनक घटना समोर आली असून हा मोबाईलच्या वेडाचा दुष्परिणाम मानला जात आहे.


लहान मुलांचे मैदानी  खेळ बंद झाले असून अखंडपणे लहान मुले मोबाईल पाहण्यात व्यस्त झाली आहेत. वडील आपल्या उद्योगाला जातात आणि आई घरात कामात अडचण नको म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देतात. या मोबाईलवर मुले काय पाहतात आणि त्याचा त्यांच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार देखील आई वडील करीत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत आणि छोट्या मुलांचे प्राण देखील गेले आहेत. मोबाईलमधील वेगवेगळे व्हिडीओ पाहून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न लहान मुले करीत असतात आणि जीवन काय आहे हे कळायच्या आधीच त्यांना हे जग सोडण्याची वेळ येते. अशाच प्रकराची एक करून आणि अत्यंत दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवड च्या थेरगाव येथे घडली आहे. 


सुरक्षारक्षक असलेल्या वडिलाच्या आठ वर्षे वयाच्या मुलाने खेळता खेळता आधी खेळण्यातील एका बाहुलीला फासावर दिले. बाहुलीला फाशी देण्याआधी तिच्या तोंडाला कापड बांधले आणि तिला फासावर दिले. त्यानंतर या आठ वर्षे वयाच्या मुलाने आपल्याही तोंडाला कापड बांधले आणि गळ्यात दोरी अडकवून स्वत:ला लटकावून घेतले. कपडे वाळत घालण्याची दोरी घेवून ती खिडकीला बांधून स्वत:ला लटकावून घेतले. (Child accidentally commits suicide while playing with a doll)यात या बालकाचा मृत्यू देखील झाला आहे. 


आईने पहिले तेंव्हा ---
मुलगा बाहुलीसोबत खेळतो आहे तेवढ्यात घरातील कामे उरकून घ्यावीत म्हणून आई आपल्या कामात व्यस्त राहिली. बराच वेळ या मुलाचा आवाज येत नाही म्हणून आईने पाहिलं तर मुलगा कपडे वाळत घालण्याच्या दोरीने लटकत असल्याचे दिसले तर बाहुलीला टॉवेलने लटकविण्यात आलेले आईला दिसले. एकूण प्रकार पाहून आईला मोठा धक्का बसला !


मोबाईलचा परिणाम 
सदर लहान मुलाला मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहण्याची सवय होती आणि तो हॉरर, भीतीदायक व्हिडीओ मोबाईलवर पहात असायचा. या मुलाने मोबाईलमधील व्हिडीओ पाहून हा प्रकार केला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !