पोलीस ठाण्यात आता सीसीटीव्ही चित्रणासह आवाजांचेही रेकॉर्डिंग केले जाणार असून यामुळे पोलीस ठाण्यात नेमके काय घडले हे समोर येणार आहे. सोलापूर शहरातील काही पोलीस ठाण्यात ही सुविधा राबविणे सुरु झाले आहे.
पोलीस ठाण्यात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. अनेकदा अटकेतील आरोपी पळून जातात तर कधी कोठडीतील आरोपींचा मृत्यू देखील होत असल्याच्या घटना वादग्रस्त ठरतात. पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईक करीत असतात. फिर्यादी, आरोपी, पोलीस यांच्यात नेमका या संवाद झाला याचा पुरावा असणारी काहीच माहिती उपलब्ध होत नसते त्यामुळे अनेक शंका कुशंकाना वाव मिळत असतो. पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही चित्रण होत असते परंतु यात आवाजाची व्यवस्था नसल्यामुळे नेमका संवाद काय आणि कसा झाला याची माहिती समोर येत नाही परंतु आता हा संवाद देखील मुद्रित होणार आहे त्यामुळे अनेक बाबी या सुलभ होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि आदेशानुसार पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही चित्रणासह आवाजाच्या रेकॉर्डिंगची सोय केली जाणार आहे. यामुळे पोलीस अधिकारी, फिर्यादी, आरोपी आणि पोलीस कर्मचारी यांच्यात झालेला संवाद ध्वनीमुद्रित होणार आहे. यामुळे कुठल्याही घटनेत नेमके काय बोलणे झाले यांनी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडताळून पाहता येणार आहे. लाचेची मागणी केली असेल तर ते देखील यात सापडणार आहे, किमान या कक्षेत तरी लाचेची मागणी केली जाणार नाही. फिर्याद देण्यास आलेल्या फिर्यादीस अरेरावीची भाषा पोलिसांनी केली असल्यास अथवा पैशाची मागणी केली असल्यास तसेच वागणूक व्यवस्थित दिली नसल्यास त्याचा पुरावा मिळणार आहे. अनेकदा पोलिसांनी आपली फिर्याद घेतली नसल्याचे आरोप पोलिसांवर होत असतात परंतु याबाबत काहीच पुरावे मिळत नसतात. अनकेदा खोटे आरोप पोलिसांवर होत असतात त्यामुळे पोलिसांना अकारण बदनामीला सामोरे जावे लागते. परंतु या नव्या तंत्रज्ञांनामुळे नेमके पुरावेच हाती येणार असून कुठल्याही घटनेतील सत्य बाहेर येण्यास मदत होणार आहे.
चित्रणासह आवाजाचे देखील रेकोर्डिंग होणार असल्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे तसेच पोलिसांनी काही गैरवर्तन केल्यास त्यांच्याविरोधात नेमके पुरावे उपलब्ध होणार असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे देखील सोपे जाणार आहे. (Conversation recording at the police station) या नव्या तंत्रामुळे लाचेची मागणी कमी होईल अशीही काहींची अपेक्षा आहे परंतु लाचेची मागणी या कक्षेच्या बाहेर देखील करण्यात येऊ शकते हे देखील विचारात घेणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !