BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जून, २०२२

शिवसेना आमदाराला गोळ्या घालण्याची धमकी !

 



अंबरनाथ : राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे वादळ आले असताना शिवसेनेंचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना थेट गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 


शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाने मोठे बंड केल्यापासून राज्यभरात काहूर माजले आहे आणि आता निर्णायक वेळ येवून ठेपली आहे. उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव देखील येणार आहे. शिवसेनेतून बंड करून गुवाहाटी गाठलेल्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेत प्रचंड संताप आहे. बंडखोर आमदारांचा जोरदार निषेध करण्यात येत असून अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले देखील करण्यात आले आहेत. या आमदारांच्या कार्यालय आणि घरांना केंद्राने सुरक्षा पुरविण्यात आली आहे. बंडखोर आमदार यांच्याबाबत प्रचंड संताप असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना आता एका बंडखोर आमदारांना थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीने खळबळ तर उडालीच आहे परंतु चिता देखील व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. 


अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे बंड करून एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. यामुळे संतापलेल्या अज्ञात व्यक्तीने आमदार किणीकर यांनी गोळी घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  किणीकर यांना अज्ञात व्यक्तीने एक पत्र पाठवून ही धमकी दिली आहे. (
Shiv Sena MLA threatened to shoot_आमदार किणीकर यांचे क्लार्क प्रकाश भोगे यांनी याबाबत अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


गोली मारने का दिन !
"आमदार बालाजी, तेरेको गोली मारनेका दिन आ गया है, हमारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है .... इसीलिये तुझे मारनेका है. बता इसिलिये रहा हुं, जब मै मारुंगा वह दिन तय है. तब तक तू रोज डर डर के जिये" असे सदर अज्ञात व्यक्तीने या धमकीच्या पत्रात म्हटले आहे.        


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !