BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ एप्रि, २०२२

वायरमनने वसुली केली पण रक्कम केली हडप ! सरपंचांची तक्रार



सोलापूर : वायरमनने शेतकऱ्यांकडून विजेचे बिल वसूल केले पण ही रक्कम त्याने महावितरणकडे जमाच केली नाही असा खळबळजनक प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला असल्याची तक्रार सरपंच प्रेम चव्हाण यांनी महावितरणकडे केली आहे. 

विजेची बिले भरली  नाहीत म्हणून महावितरण थेट विद्युत पुरवठा खंडित करते आणि शेतकऱ्यांची पिके जळून गेली तरी त्याची पर्वा करीत नाही. बिले न भरणाऱ्या ग्राहकावर कारवाई केली जाते आणि बिले भरणे ही ग्राहकाची जबाबदारी असते पण शेतकऱ्यांनी बिले भरलेली असताना देखील कुणाच्या तरी भानगडीमुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो याचे हे उत्तम आणि संतापजनक उदाहारण समोर आले आहे. पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील एक कंत्राटी वायरमनने ७० हजाराचा घपला केला असल्याची अत्यंत गंभीर आणि खळबळजनक तक्रार केली आहे. वसूल केलेली वीज बिलाची रक्कम हडप केल्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे.  

कंत्राटी म्हणून कार्यरत असलेल्या एका वायरमनने शेतकऱ्यांकडून वीज बिलांची वसुली केली, शेतकऱ्यांनी देखील आपल्या बिलाची रक्कम या वायरमनकडे दिली पण त्याने ही रक्कम महावितरणकडे जमा केलीच नाही. बिलांची रक्कम दिली असतानाही शेतकऱ्यांना याच्या पावत्या देखील दिल्या नाहीत अशा प्रकारची गंभीर तक्रार महावितरणच्या पंढरपूर कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली होती. संबंधित वायरमन हा पूर्वीपासूनच अरेरावीची भाषा वापरत  विविध कामांच्यासाठी शेतकऱ्याकडून पैसे उकळत आहे आणि या भानगडीत एका सहायक अभियंत्याचा देखील हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Wireman recovered but grabbed the amount)  माढा - पंढरपूरचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडे देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !