BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ एप्रि, २०२२

खून करून आत्महत्येचा बनाव, पाच खून उघडकीस !


पुणे : जवळच्याच व्यक्तीचा खून करून आत्महत्येचा आभास निर्माण करण्याच्या पाच घटना उघडकीस आल्या असून हे खून आत्महत्या केल्याचे दाखविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


खून करून नंतर फासावर लटकावून आत्महत्या केल्याचा अनेकदा बनाव करण्याचा पर्यंत गुन्हेगार करीत असतात पण हे प्रकार पोलीस तपासात आणि वैद्यकीय तपासणीत उघड होत असतात. गुन्हेगाराने मागे सोडलेले अनेक पुरावे पोलिसांना मिळून येतात. शिवाय मयत व्यक्तीच्या कुटुंबाकडून संबंधित गुन्हेगाराबाबत तक्रारही करण्यात येत असते. पुण्यात मात्र घरातील लोकांनीच थंड डोक्याने केलेले खून आत्महत्या भासवले गेले असून चार महिन्यात अशा प्रकारे केलेले पाच खून उघडकीस आल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मयत व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आभास घटनास्थळी निर्माण करण्यात आला पण वैद्यकीय तपासणीत हा बनाव उघड होऊन त्या आत्महत्या नव्हे तर खून असल्याचे उघडकीस आले आहे. 


सदर पाच खून हे कुणी अन्य व्यक्तीकडून झालेले नसून घरातच घडलेल्या घटना आहेत. पती-पत्नी, मुलगा आणि वडील, सून आणि सासरा यांच्यातील या धक्कादायक घटना आहेत. सदर मयत व्यक्तीच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आणि त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात पाच व्यक्तींच्या आत्महत्या नसून त्यांचे खून करण्यात आले होते हे समोर आले आहे. पुण्याच्या सिंहगड, कात्रज अशा उपनगरी भागात घडलेल्या या घटना असून खून केल्यानंतर आत्महत्येचे वातावरण तयार करून खून पचविण्याची युक्ती करण्यात आली पण काही दिवसातच हे खून होते यावर शिक्कामोर्तब झाला आहे. 


खून करून नंतर मृतदेह दोरीच्या सहाय्याने पंख्याला लटकाविण्यात आला पण घटनास्थळावर आढळलेली दोरी आणि मृतदेहाच्या गळ्यावरील व्रण वैद्यकीय तपासात जुळून आले  नाहीत. गळफास घेतल्यानंतर शरीरात विशिष्ठ प्रकारे बदल होतात पण ते या प्रकरणात दिसून आले नाहीत. शरीरावरील खुणा, जखमा, पंचानाम्यातील प्राथमिक खबर आणि हकीगत यात पूर्णपणे तफावत दिसून आली. काही गुन्ह्यात ओढणी किंवा नायलॉन दोरीने गळा आवळल्याचे तपासणीत दिसून आले. शवविच्छेदन करताना डोक्याला आणि गळ्याच्या आतल्या बाजूला जखमा दिसून आल्या. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर आत्महत्या केल्याचे कुठेच आढळून आले नसल्याने या अहवालावरून पोलिसांनी या पाच खुनांचा छडा लावला आहे.  


बनाव झाला अयशस्वी ! 

सदरच्या खुनाच्या पाचही घटना नात्यातच घडल्या आहेत आणि खून करून त्या आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी तशा पद्धतीचे वातावरण तयार करण्यात आले आणि पोलिसांना देखील तसेच भासविण्यात आले. आपला बनाव यशस्वी झाल्याचा त्यांचा आनंद मात्र फार काळ टिकला नाही. (Revealed five murders showing suicide) मृतदेहाची तपासणी होताच या बाबी समोर आल्या आणि पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करताच हे पाचही खून असल्याचे स्पष्ट झाले.       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !