सोलापूर : फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपात सांगोला पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस उच्च न्यायालयाने जामीन (Bail Granted) मंजूर केला आहे, पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
पिडीत महिलेशी संपर्क करून, ओळख वाढवून तिच्यासोबत व्हाटस ऍप वरून चॅटिंग करून तिच्याशी जवळीक साधली. महिलेच्या सोबत सेल्फी आणि फोटो काढून नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी संबंध प्रस्थापित केला असा आरोप पीडित महिलेने केला आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुमठा नाका, सोलापूर येथील अभिषेक कोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सांगोला पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी कोरे यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपी अभिषेक कोरे याने जामीन मिळण्यासाठी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
पंढरपूर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर कोरे याने ऍड. जयदीप माने (Ad. Jayadip Mane, Solapur) यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर झाली. यावेळी युक्तिवाद करताना आरोपीचे वकील ऍड. जयदीप माने यांनी युक्तिवाद करताना पीडित महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमप्रकरण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सदर आरोपीने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्याचे दिसून येत नाही, पीडित महिला आणि आरोपी यांच्यातील मोबाईल संभाषणावरून त्यांच्यात प्रेमप्रकरण होते हे दिसून येत आहे असा युक्तिवाद ऍड जयदीप माने यांनी केला.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी अभिषेक कोरे याचा जामीन अर्ज मंजूर केला आणि आरोपीला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (Accused in rape case granted bail in High Court) याप्रकरणी आरोपीच्या वतीने ऍड जयदीप माने, ऍड. अतुल भोसले (सांगोला), ऍड. सिद्धेश्वर खंडागळे यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने ऍड. आर. एम. पेठे यांनी काम पहिले.
हे देखील वाचा :
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !