BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ एप्रि, २०२२

सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा इशारा !

 



सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून आज सकाळ पासूनच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. 

उन्हाळ्याची तीव्रता आणि तपमान वाढत असताना अधूनमधून येत असेलल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना हवामान खात्याने आणखी चिंता वाढवली आहे. उन्हाळा आणि उकाडा यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच काल सायंकाळी वातावरणात बदल झाला होता. अचानकपणे पावसाची परिस्थिती तयार झाली होती. शिवारातील पिके आणि द्राक्षांच्या बागा अंतिम टप्प्यात असताना पावसाचा हा अंदाज शेतकरी वर्गाच्या काळजाचा ठोका चुकवत असून चार दिवसाचा हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे, त्यानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


राज्यात पुढील तीन दिवस विचित्र आणि भिन्न हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अवकाळी पावसासह कुठे गरपीठ तर कुठे  उष्णतेची लाटा अशा प्रकारचे हवामान पुढील तीन दिवसांत राहणार आहे. मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पाउस होण्याची शक्यता असून आज काही ठिकाणी गारपीठ देखील होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पावसाची परिस्थिती असतानाच राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाचा अनुभव पुढील तीन दिवसात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. 


आज रविवारी सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर तसेच रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सोमवारी अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात गारापीठ होण्याची शक्यता असून मंगळवारी जळगाव, अहमदनगर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपीठ आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Rain today in western Maharashtra including Solapur) अन्य काही जिल्ह्यात उद्या आणि परवा देखील गारपीठ, पाऊस असा अंदाज दिलेला आहे


कालपासून पाऊस 
सोलापूर, पुणे जिल्ह्याच्या काही भागात कालपासूनचा पावसाळी वातावरण होऊन पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. सोलापूर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आणि अनेक भागात सकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान ढगाळ असून आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.  


   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !