BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मार्च, २०२२

अवकाळी पावसाचे आसमानी संकट येतेय !





पुणे : कोरोनाच्या संकटापाठोपाठ विजेचे संकट आले असतानाच आता अवकाळी पावसाने चिंतेचे ढग जमा केले असून पुढील पाच दिवसात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगणेच काय, मरणे देखील कठीण केले होते. हे संकट आता कुठे दूर जाताना दिसू लागल्याने दिलासा मिळू लागला असतानाच वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने शिवारातील पिके धोक्यात येत आहेत. एवढ्यात शेतकरी बांधवाची चिंता वाढविणारा आसमानी संकटाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. द्राक्ष अंतिम टप्प्यात आली असताना अवकाळी पावसाचा हा अंदाज चिंता वाढविणारा ठरला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असतानाही पावसाची शक्यता निर्माण झाली असून गेल्या काही वर्षात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केलेले आहे. 


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्र राज्यावरही याचा परिणाम पाहायला मिळणार असून उद्या सोमवार ७ मार्चपासून काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस ओहील असा अंदाज देण्यात आलेला आहे. (Rain in maharashtra) राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान असल्याने कमाल तापमानात घट झाल्याचे आढळून आले आहे. कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र उत्तर - पूर्व दिशेने पुढे पुढे सरकत असल्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि जवळच्या राज्यात काही ठिकाणी  हा पाउस होण्याची शक्यता आहे.


कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असल्यामुळे बाष्प महाराष्ट्राच्याही दिशेने येत असून उद्या ७ मार्चपासून काही भागात या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात हा पाउस होईल. पुणे जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, अकोला, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम,धुळे, नंदुरबार, यवतमाळ, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाउस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Weather forecast rain in summer)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !