BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मार्च, २०२२

आपण यांना पाहिलंत का ? एका चिट्ठीने उडाली आहे प्रचंड खळबळ !!

 




पुणे  : उपोषणाला बसलेले दाम्पत्य एक चिट्ठी ठेवून बेपत्ता झाले असल्याने प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस यांचा शोध घेत आहेत, त्यामुळे छायाचित्रातील दोघे कुणाला आढळले तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील डिग्रजवाडी येथील एका कंपनीने अचानकपणे आपल्या काही कामगारांना कामावरून कमी केले आहे. यामुळे कामगार आणि कंपनी यांच्यात संघर्ष सुरु झाला शिवाय कामगारांनी कंपनीशी चर्चा देखील केली पण त्यातून काही मार्ग निघाला नाही. यातील काही कामगार २८ फेब्रुवारीपासून सहकुटुंब उपोषणाला बसले आहेत. या उपोषणात रामदास गव्हाणे आणि आरती गव्हाणे हे पती पत्नी देखील सहभागी झालेले होते. परंतु हे गव्हाणे दाम्पत्य अचानक ७ मार्च पासून बेपत्ता झालेले आहेत. उपोषणकर्ते दाम्पत्य अचानक बेपत्ता झालेले असल्यामुळे अन्य कामगारात एकच खळबळ उडाली आहे. 

गव्हाणे पती पत्नीने बेपत्ता होण्यापूर्वी एक चिट्ठी ठेवलेली असल्याने तर अधिक चिंता निर्माण झाली आहे.  कंपनीने अचानक कामावरून कमी केल्यामुळे बँकेचे कर्ज आणि मुलांचे शिक्षण व पुढील भविष्य अडचणीत आले आहे. आठ दिवस उपोषण करूनही आमच्या समस्यांचे निवारण होत नाही आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कंपनी व्यवस्थापक जबाबदार असून आमच्या मागे किमान आमची मुले, वयस्कर सासूबाई यांना तरी न्याय देण्यात यावा' अशा आशयाची एक चिट्ठी रामदास शिवाजी गव्हाणे आणि आरती रामदास गव्हाणे यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून ठेवली आहे. त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. 

उपोषणास बसलेले हे दाम्पत्य अशा प्रकारची चिट्ठी ठेवून बेपत्ता झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून या दांपत्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदर दोघांच्या संदर्भात कुणाला काही माहिती मिळाल्यास ९६५७००२१८४ या क्रमांकावर शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हान देखील पोलिसांनी केले आहे. 


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !