BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मार्च, २०२२

सोलापूर जिल्ह्यात सशस्त्र दरोडा, हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू !

 



सोलापूर : चोरट्यांच्या भीतीचा पगडा मनावर असतानाच सोलापूर जिल्ह्यात सशस्त्र दरोड्याची मोठी घटना घडली असून दरोड्याचा प्रयत्न फसला परंतु हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. Armed robbery in Solapur district, one killed ) 


सोलापूर जिल्ह्यात अलीकडे चोरीच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. अशा घटनांमुळे नागरिक आधीच चोरांच्या दहशतीखाली वावरत असून संधी मिळाली की घरफोडी होत असल्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडताना अनेकदा विचार करीत आहेत. नागरिक घरात थांबले तरी शस्त्राचा धाक दाखवत चोरीची घटना होतच आहे पण दक्षिण सोलापूर तालुक्यात मात्र रात्री दरोडेखोरांनी भलताच धुडगूस घातल्याचे दिसत आहे. मध्यरात्री पडलेल्या या दरोड्याने तालुक्यातील नागरिक हादरले आहेत. 


सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाजवळ असलेल्या पाटील आणि हिरडे अशा दोन कुटुंबियांच्या घरावर मध्यरात्री नंतर दरोडा टाकण्याची धाडसी घटना घडल्याचे समोर आले आहे. पाच दरोडेखोर पहाटे दीड ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास बोरामणी येथे आले आणि बाबू हिरजे यांच्या घरात घुसले.  ६५ वर्षे वयाचे बाबू कलप्पा हिरजे आणि त्यांच्या पत्नी पहाटेच्या गाढ झोपेत होते. दरोडेखोरांनी बाबू हिरजे यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील आणि कानातील दीड तोळे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. 


दरोडेखोरांचा हा प्रताप सुरु असताना बाबू हे झोपेतून जागे झाले, त्यांनी दरोडेखोराना प्रतिकार करण्यास सुरुवात केल्याने दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीसारख्या हत्याराने हल्ला केला. या आघाताने त्यांच्या डोक्यातून रक्त उडाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले. डोक्यावर जबरदस्त आघात झाल्याने बाबू हिरजे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दरोडेखोर तेथून बाहेर पडले.  तेथून दरोडेखोर निघून गेले असले तरी ते निघून न जाता गावातील पोलीस पाटील यांच्या घराकडे गेले. तेथे दरोडा टाकण्याआधीच पाटील जागे झाले आणि तेथे दरोडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. पाटील यांनी या दरोडेखोरांशी दोन हात केले. जोरदार झटापट सुरु झाली आणि या झटापटीत पाटील यांच्या हाताला चाकू लागला. पाटील यांनी मोठ्याने आवाज केल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. 


काही वेळेतच परिसरात या घटनेची माहिती मिळाली आणि पोलिसांना देखील या घटनेबाबत कळविण्यात आले.  पोलीस अधिक्षास्क तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव  जाधव आणि सोलापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांचे मनसुभे उधळले गेले पण यात ६५ वर्षीय बाबू हिरजे यांचा मात्र प्राण गेला. त्यांच्या पत्नी या देखील जखमी झालेल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडालीच पण तालुकाभर या दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली आहे. ( solapur crime )       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !