BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मार्च, २०२२

कीर्तनकर इंदुरीकर महाराज यांनी आता घेतला मोठा निर्णय !

 




बीड : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मोबाईलचा मोठा धसका घेतला असून यापुढे त्यांच्या कीर्तनावेळी मोबाईल बंदी करण्यात आली आहे. (Nivrutti maharaj indurikar)


इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी तर जमतेच पण लोक यु ट्यूबवर YouTube ) देखील त्यांचे कीर्तन ऐकत असतात. त्यांची कीर्तनाची खास शैली आहे आणि या शैलीत ते मोकळेपणे बोलून जातात. पण मोकळेपणाच्या बोलण्यावरच त्यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांनी केलेली काही विधाने वादाची ठरली आणि ती न्यायालयापर्यंत देखील पोहोचली आहेत.  पुत्रप्राप्तीबाबतचे त्यांचे विधान खूपच चर्चिले गेले आणि त्यावर बराच वाद देखील झाला.


इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे चित्रीकरण करून ते यु ट्यूबवर टाकले जाते त्यामुळे ते सर्वदूर पोहोचते आणि त्यातील एखादे वाक्य वादाचे ठरते त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. अकोला येथे सोमवारीच त्यांनी आपल्या कीर्तनात बोलताना यु ट्युबर वर जोरदार हल्ला चढवला होता. आपल्या कीर्तनाच्या क्लिप यु ट्यूबवर टाकून अनेकांनी कोट्यावधी मिळविले आणि मलाच कोर्टात खेचलं गेलं असे सांगितले. याबाबत बोलताना त्यांनी 'याचं वाटोळं होईल, यांचं चांगलं होणार नाही' असं देखील ते म्हणाले. इथवर ते थांबले नाहीत तर 'यांची मुले दिव्यांग जन्माला येतील' असे सांगून वाद ओढवून घेतला.     


समोर येणाऱ्या वादाला कंटाळून इंदुरीकर महाराज यांनी मोबाईलचा एवढा धसका घेतला की सलग दोन दिवस त्यांनी आपल्या कीर्तनावेळी मोबाईलचा वापर करू नका असे सांगितले. कितीही सांगून लोक ऐकत नसल्याचे पाहून शेवटी या लोकांना दम दिल्याच्या भाषेत सांगण्याची वेळ आली त्यामुळे इंदुरीकर महाराज यांनी पुढचा निर्णय घेऊन टाकला. त्यांच्या कीर्तनाला मोबाईल बंदी करण्याचाच निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे यापुढे ज्यांना त्यांचे कीर्तन ऐकायचे आहे त्यांना मोबाईल बाळगता देखील येणार नाही. त्यांच्या कीर्तनाला जाताना सोबत मोबाईल नेता येणार नाही. 


निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाच्या असंख्य क्लिप यु ट्यूबवर आहेत. घरोघरी लोक आवडीने त्यांच्या या क्लिप पाहात ऐकत असतात आणि कीर्तनाला गेल्याचा आनंद घेत असतात. इंदुरीकर यांची स्पष्ट वक्तव्ये लोकांना मनापासून आवडत आणि पटत देखील असतात . विविध विषयावर विनोदी अंगाने त्यांनी केलेले भाष्य ऐकून दादही देत असतात पण यापुढे नव्या क्लिप पाहता येणार नाहीत असे सद्या तरी दिसून येत आहे. Mobile ban on Indurikar Maharaj Kirtan )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !