BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मार्च, २०२२

राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्यासंदर्भात ईडी ने केलीय एक चूक !

 



मुंबई :महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना घाम फोडलेल्या ईडी लाच आज न्यायालयात घाम सुटला असून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यासंदर्भात  मोठी चूक केल्याचे ईडीला न्यायालयात कबुल करावे लागले आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी ने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची झोप उडवली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यानाही अटक केली आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांची चौकशी सद्या ईडी करीत आहे. महाविकास आघाडीतील सरकार पाडण्यासती ईडी चा वापर केला जात असल्याच्या तक्रारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी अनेकदा केल्या आहेत. शिवाय अन्य पक्षातून भारतीय जनता पक्षात गेल्यावर या चौकशा कशा थांबतात? असा सवाल देखील उपस्थित केलेला आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात ही संस्था सतत चर्चेत असताना आणि अनेकांना घाम फोडलेला असताना ईडीची एक चूक आज न्यायालयात उघडी पडली आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी युक्तिवाद होत असताना एक मोठी बाब उघडकीस आली आहे.  नवाब मलिक यांनी दाऊदची बहिण हसीना पारकर हिला ५५ लाख दिल्याचा दावा ईडीने केला होता. प्रत्यक्षात ५५ लाख नसून ५ लाखच दिले असल्याचे आज ईडीने रिमांमध्ये म्हटले आहे. टाईप करताना चूक झाली असल्याचे आता ईडी सांगत आहे पण या चुकीमुळे मलिक यांनी ईडी कोठडीत दिवस काढले आहेत, ईडीने व्यवस्थित गृहपाठ करावा असे मलिक यांच्या वकिलांनी म्हटले आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद करताना हा मुद्दा उपस्थित केला. मलिक यांनी ५५ लाख दिल्याचा दावा करणाऱ्या ईडीने रिमांडमध्ये ५ लाख म्हटले आहे ही विसंगती त्यांनी निदर्शनास आणून दिली. दरम्यान मलिक यांना आजही न्यायालयाने दिलासा दिला नसून त्यांना ७ मार्च पर्यंत ईडी कोठडी दिली आहे. मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांना ९ दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती, आज ती ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.   


२३ फेब्रुवारीस मलिक यांना ईडी ने अटक केल्यानंतर ९ दिवसांची कोठडी देण्यात आली असली तरी मलिक हे २५ ते २८ फेब्रुवारी पर्यंत वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे त्याची कोठडी आणखी वाढवून देण्यात यावी असा युक्तिवाद करण्यात आला. त्यानुसार मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी  भाजपने लावून धरली आहे. मलिक यांचा राजीनामा झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !