BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मार्च, २०२२

अपघात, वाळू तस्करांच्या पाठलागात तहसीलदार जखमी, मंडल अधिकारी ठार !






बीड : अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गाडीला अपघात होऊन तहसीलदार जखमी झाले तर त्यांच्यासोबत असलेले मंडळ अधिकारी ही मात्र या अपघातात ठार झाले. (Accident)  


राज्यात वाळू तस्करीचे प्रमाण मर्यादेपेक्षाही अधिक झाले असून सगळीकडे अवैध वाळूचा व्यवसाय तेजीत आहे. प्रशासनातील काही लोकांना हाताशी धरून आणि त्यांचे हात 'ओले' करून वाळू तस्कर आपले 'उखळ पांढरे' करून घेत आहेत. प्रशासनातील या घरभेदी मंडळीमुळे वाळू तस्करांचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरु आहे. या व्यवसायावर कारवाया होतात, वाळू उपसा करणाऱ्या बोटी फोडल्या जातात पण या व्यवसायात किंचितही घट झाली नसून अत्यंत मुक्तपणे राज्यात सगळीकडेच हा व्यवसाय फोफावला आहे. शिवाय यातून मिळणाऱ्या पैशामुळे गुंडगिरीलादेखील उत्तेजन मिळताना दिसत आहे. 

कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या अंगावर वाहने घालून त्यांना ठार मारण्याचा देखील प्रयत्न अनेकदा या वाळू तस्करांनी केलेला आहे. बीड येथे मात्र दुर्दैवी घटना घडली असून यात मंडळ अधिकारी यांचा प्राण गेला आहे आणि तहसीलदार जखमी झाले आहेत. अवैध वाळू वाहतुकीच्या (Sand theft) विरोधात कारवाई करण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन मार्गावर सावळेश्वर फाट्याजवळ ही दुर्घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली आणि महसूल विभागावर शोककळा पसरली. 

गेवराई तालुक्यातील गोदावरी आणि सिंदफणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा होत आहे, याबाबत सातत्याने तक्रारी देखील येत आहेत. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून महसूल आणि पोलीस विभाग या वाळू चोरांवर कारवाई करीत असल्याचे दिसत आहे.  बेकायदेशीर होत असलेला वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने पथकच तयार केले आहे.  बीड येथील प्रभारी तहसीलदार डोके आणि म्हाळस जवळा येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक कारवाईसाठी एका गाडीतून गस्त घालत होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या गाडीस अपघात झाला आणि या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव हे ठार झाले तर तहसीलदार डोके हे जखमी झाले आहेत . 

तहसीलदार यांची ही गाडी भरधाव वेगात असताना रस्त्याच्या खाली जाऊन एका झाडावर आदळली, गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यात तहसीलदार डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी जाधव यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.  सुरुवातीला पोलीस दलात नोकरी केलेले नितीन जाधव यांनी नंतर महसूल विभागात नोकरी मिळवली होती. बीड जिल्हा महसूल मंडळाचे सचिव म्हणून देखील ते काम पाहत होते.  (Accident Sand-theft-Beed-district)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !