BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२२

नराधमाला एका वर्षात फाशीची शिक्षा !

 



पुणे : बिस्किटाचे आमिष दाखवून अपहरण करून अवघ्या दोन वर्षे वयाच्या एका चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या पाशवी नराधमाला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा (Death sentenced) सुनावली आहे. 


गेल्या वर्षीच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मालखेड येथे थरकाप उडविणारी घटना घडली होती. कातकरी समाजातील अवघ्या दोन वर्षे वयाच्या बालिकेला पैसे आणि बिस्कीट देण्याचे आमिष दाखवत ३८ वर्षाच्या संजय काटकर या नराधमाने तिचे अपहरण केले आणि नंतर बलात्कार केला होता. नंतर ही चिमुकली मुलगी मृतावस्थेत आढळून आली होती.  एवढ्या लहान मुलीवर बलात्कार करून तिला तशाच अवस्थेत सोडून हा काटकर नावाचा पशु पळून गेला होता. या मुलीचा मृतदेह एका पुलाच्या मोरीत सिमेंटच्या नळीत मिळून आला होता. मुलीचे आईवडील पानशेत येथे रोजंदारीने कामाला जात होते याचाच गैरफायदा कादवे, पानशेत येथील संजय बबन लाटकर या नराधमाने घेतला. 


ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ४८ तासांच्या आत या नराधमाच्या मुसक्या आवळल्या होत्या. अत्यंत संवेदनशिल प्रकरण असल्याने पोलिसांच्या विनंतीने सदर खटला जलदगती न्यायालयात चालला आणि नराधम आरोपी संजय काटकर (Rape accused) याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. घटना घडल्यानंतर एका वर्षात न्यायालयाचा हा निकाल आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजी नगर पुणे या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली आणि आरोपीला मरेपर्यंत  फासावर चढविण्याचा आदेश देण्यात आला.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !