शोध न्यूज : ओडिशाचे आरोग्यमंत्री यांना कार्यकर्त्यांच्या गर्दीत असताना झालेल्या गोळीबाराने देशभरात खळबळ उडाली असतानाच त्यांना कशा प्रकारे गोळी लागली याचा व्हिडीओ समोर आला आहे.
ओडीसाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्री नबा दास हे ब्रजराजनगर येथील गांधी चौक इथं एका कार्यक्रमासाठी गेले होते. बीजू जनता दल पक्षाच्या कार्यालयचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्यातील गांधी चौकातून गाडीतून उतरून ते कार्यक्रमस्थळी जाणार होते. या चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यांची गाडी थांबतच ते गाडीतून उतरू लागले आणि त्यांना पुष्पहार घालण्यासाठी काही नेते, कार्यकर्ते पुढे झाले. एकाने त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि त्याचवेळी एक गोळी थेट त्यांच्या छातीत घुसली. हे एवढ्या क्षणार्धात झाले की सुरुवातीला काय घडतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही. जेंव्हा मंत्री छातीला हात लावून कोसळू लागले तेंव्हा हा प्रकार लक्षात आला आणि मग एकच गोंधळ उडाला.
कारमधून उतरून पायीचे पक्षाच्या कार्यालयाकडे जाणार होते. त्याच वेळी गोपालचंद्र दास या पोलीस इंन्स्पेक्टरने गोळ्या झाडल्या. गोपालदास याची ड्युटी गांधी चौक पोलीस ठाण्यात होती आणि त्याने आपल्या सरकारी रिव्हाल्व्हरमधून हा गोळीबार केला आहे. त्याने हा गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून केला, आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर त्याचा काय राग होता की त्याने ही सुपारी घेतली होती याबाबत लगेच काही समजले नाही तथापि पोलीस याचा तपास करू लागले आहेत. या घटनेने देशपातळीवर खळबळ उडाली असून दास यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या छातीत डाव्या बाजूला गोळ्या लागल्या असून मोठा रक्तस्त्राव देखील होत असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमधून दिसून आले आहे.
ओडीसाचे आरोग्यमंत्री नबा दास यांना गोळ्या लागल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
गोळीबारात जखमी आणि नंतर मृत्यू झालेले आरोग्यमंत्री नबा दास हे शनीदेवाचे भक्त होते आणि त्यांनी मागील आठवड्यातच त्यांनी शनी शिंगणापूर येथे शनी देवाला एक कोटी रुपयांचा कलश अर्पण केला होता. एक किलो एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला होता. नबा दास हे ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. त्यांच्याकडे संबलपूर, भुवनेश्वर आणि झारसुगुडा येथील विविध बँकांमध्ये ४५ लाख रुपयांहून अधिक ठेवी आहेत. त्यांच्यांकडे सुमारे १५ कोटी रुपयांची सत्तरपेक्षा अधिक वाहने आहेत. त्यात एक कोटी चौदा लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंझ देखील समाविष्ट आहे. त्यांच्यावर अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.
आरोग्यमंत्री नबा दास हे आपल्या गाडीतून उतरत असताना आणि कार्यकर्ते त्यांना हार घालत असताना झालेल्या या गोळीबाराचा एक व्हिडीओ समोर आला आहे .(Video of firing on Orissa Health Minister Naba Das) या व्हिडीओतून घटना नेमकी कशी घडली हे दिसत आहे. पहा हा व्हिडीओ >>>>>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !