BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मार्च, २०२२

पंढरपूर तालुक्यात अफूची शेती !

 




पंढरपूर : शेतकरी संकटात असल्याची चर्चा सुरु असतानाच पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे एका शेतकऱ्याने चक्क बंदी असलेल्या अफूची लागवड केली असल्याचे निदर्शनास आले असल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी चर्चेत आला आहे. 


पंढरपूर तालुक्यात काल मगरवाडी येथील शेतकरी सुरज जाधव याने कर्जबाजरी होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने खळबळ उडाली असताना आज एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफूची लागवड केल्याचे पोलिसांनी पकडले आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चर्चेत आला आहे. शेतीच्या विविध अडचणीमुळे शेतकरी संकटात असतानाच वीज बिले थकवल्याने महावितरणकडून थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येत आहे, त्यात एका शेतकऱ्याने चक्क कायद्याने बंदी असलेल्या अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुन्हा वेगळीच खळबळ उडवून दिली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.   सुस्ते येथील एका शेतात अफूची लागवड केली असल्याची गुप्त माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर शेतात छापा टाकून पाहणी केली असता येथे खरोखरच शेतात अफू लागवड केली असल्याचे पोलिसांच्य निदर्शनास आले. पोलिसांनी अफूची पाचशे बासष्ठ रोपे आणि अफूची बोंडे हस्तगत केली असून शेतकरी यास अटक करण्यात आली. अफू, गांजा अशी लागवड करण्यात भारतात बंदी आहे पण एका शेतकऱ्याने हे धाडस केल्याचे सुस्ते येथे आढळून आले आणि एकच खळबळ उडाली आहे. 


बंदी असलेल्या अफूची लागवड केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आपल्या पथकासह संबंधित शेतात धाव घेतली. यावेळी मक्याच्या पिकात अफू लागवड केली असल्याचे पोलिसांना दिसून आले.   तानाजी रावसाहेब जाधव यांच्या शेतात हा धक्कादायक प्रकार पोलिसांना आढळून आला असून पोलिसांनी ही अफू हस्तगत केली आहे आणि शेतकरी तानाजी जाधव या शेतकऱ्यास अटक केली आहे. २९ हजार ५०० रुपये किमतीची ही अफू पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुस्ते परिसरात खळबळ उडाली.  देशात अनेक ठिकाणी अफूची लागवड केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत पण पंढरपूर तालुक्यात देखील असा प्रकार समोर आल्याचे आश्चर्य व्यक्त होत  आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !