BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ मार्च, २०२२

तुमच्या होळी, धुळवडीवर आहे पोलिसांची बारीक नजर !

 



मुंबई : होळी आणि  धुळवडीच्या सणाचा आनंद मनामनात आहे पण हे उत्सव साजरे करताना पोलिसांची बारीक नजर असल्यामुळे शासनाने ( Maharashtra government) घालून दिलेले नियम नाही पाळले तर अडचणीत येण्याची शक्यता अधिक आहे. 


कोरोनाचा प्रभाव आणि प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने अनेक प्रकारचे निर्बंध कमी केले आहेत परंतु कोरोना संपलेला नाही याची देखील सतत जाणीव करून दिली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल असले तरी एकदम मोकळेपणाने होळी आणि धुळवड साजरी करता येणार नाही. या सणासाठी शासनाने नियम घालून दिले असून गृह खात्याच्या या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठीच शासनाने नवी नियमावली ( New guidelines for holi, rangapanchami) जाहीर केली असून ती प्रत्येकाला माहित असणे तेवढेच आवश्यक आहे.   


शासनाच्या नियमावलीनुसार होळी आणि धुळवड, रंगपंचमी रात्री दहा वाजल्यानंतर साजरे करता येणार नाहीत आणि दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु असल्यामुळे  डीजे वाजवता येणार नाही. शासनाने तशा स्पष्ट सूचनाच दिलेल्या आहेत. धुळवड साजरी करताना जबरदस्तीने रंग टाकला जाऊ नये अथवा रंग किंवा पाण्याचे भरलेले फुगे मारण्यात येऊ नयेत अशा सूचनांचा देखील यात समावेश आहे. होळीसाठी रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे, कुठल्याही जाती अथवा धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या घोषणा देण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार असून नियम न पाळणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर  कारवाई Government rules for Holi, Rangpanchami) देखील करण्यात येणार आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !