BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ मार्च, २०२२

बारा लाखांच्या चोरीने हादरले पंढरपूर !

 



पंढरपूर : चोरांचे दडपण मनावर ठेवून वावरत असलेल्या पंढरपूर शहरात झालेल्या बारा लाखांच्या चोरीने नागरिक पुन्हा हादरले. इसबावी येथील एका घरातून मोठी चोरी झाली ( Pandharpur Crime) असल्याचे समोर आले आणि पुन्हा एकदा नागरिक भयभीत झाले. 


पंढरपूर शहर आणि परिसरात अलीकडे चोरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. घर बंद दिसले की ते फोडले जात आहे आणि संधी मिळेल तेथे आपला प्रताप दाखवला जात आहे. गेल्या वर्षभरात पंढरपूर शहर आणि उपनगरातून अनेक चोऱ्या झाल्या आहेत. पंढरपूर पोलीस मोठ्या परिश्रमाने चोरट्यांना पकडून नागरिकांचा चोरीला गेलेला माल परत मिळवून देत आहेत, चोरट्यांना शिताफीने पकडून त्यांची रवानगी गजाआड करताना दिसत आहेत तरी देखील चोरांचे प्रताप कमी होताना दिसत नाहीत. नुकतेच पोलिसांनी पंढरपूर शहरातील दोन चोऱ्यामधील आरोपी मुद्देमालासह पकडले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला तोच इसबावी परिसरात चोरट्यांनी पुन्हा मोठी चोरी केली असल्याचे समोर आले. 


पंढरपूर शहराच्या इसबावी उपनगरातील टुरिस्ट व्यावसायिक अरविंद प्रमोद भोसले यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहून साडे एकवीस तोळे सोने आणि रोख तीन लाख अशी १२ लाख २० हजार रुपयांची चोरी झाली आणि या चोरीने पंढरपूर पुन्हा एकदा हादरले. Twelve lakhs stolen from Pandharpur Isbawi) भोसले कुटुंब घराला कुलूप लावून गणपती पुळे येथे गेले होते. १२ मार्च रोजी कुटुंबासह ते गेले आणि १४ मार्च रोजी सायंकाळी ते पंढरपूरकडे परत निघाले होते. शेजारी राहणारे त्यांचे भाऊ प्रश्न यांचा पहाटेच्या दरम्यान अरविंद भोसले याना फोन आला आणि घरी चोरी झाल्याची माहिती त्यांना मिळाली. 


--आणि चोरी झाली !

अरविंद भोसले यांच्या घराच्या शेजारीच त्यांचे भाऊ प्रशांत भोसले राहतात. प्रशांत भोसले यांच्या घराला चोरटयांनी बाहेरून काडी लावली आणि अरविंद भोसले यांच्या घराच्या दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोरटे पसार झाले. आपल्या घराला बाहेरून कडी लावली असल्याचे रात्री २ वाजण्याच्या सुमारास प्रशांत भोसले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जवळच्या शेजाऱ्यास फोन करून कडी काढण्यास सांगितले. ते जेंव्हा बाहेर आले तेंव्हा अरविंद भोसले यांच्या घरी चोरी झाली असल्याचे लक्षात आले. 


एकवीस तोळे सोने चोरी !

भोसले यांच्या घरातून साडे एकवीस तोळे सोन्याची चोरी झाली यात प्रत्येकी एक तोळे वजनाच्या सोन्याच्या ८ अंगठ्या, साडे तीन तोळे सोन्याचे ब्रासलेट, साडे तीन तोळ्यांचे लॉकेट, साडे तीन तोळ्यांचे गंठण, तीन तोळे सोन्याच्या झुबे, कर्णफुले तसेच तीन लाख रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे.  


ठेवीची रक्कम चोरी !

अरविंद भोसले यांच्या घरातून तीन लाखांची रोख रक्कम चोरीला गेली. ही रक्कम त्यांनी नुकतीच आणून घरात ठेवली होती. मर्चंट बँकेत असलेली मुदत ठेवीची पावती मोडून आलेली तीन लाखांची रक्कम त्यांनी परगावी जाण्यापूर्वी आपल्या घरात ठेवली होती. घरात कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली ही रक्कमही चोरटयांनी लंपास केली.


तपासासाठी पथके !

सदर चोरीची घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली असून ती या तपासासाठी रवाना झाली आहेत. लवकरच या आरोपीना जेरबंद केले जाईल हा विश्वास पोलिसांना आहे पण नागरिकाना मात्र या चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा हादरा (Citizen Panic) बसला आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !