पंढरपूर : महसूल प्रशासनाने आज वाळू चोरांना जोरदार दणका दिला असून वाळू चोरीसाठी वापरल्या जात असलेल्या अकरा लाकडी होड्यांचा (Wooden boats) अक्षरश: चुराडा करण्यात आला आहे.
राज्यासह पंढरपूर भीमा नदीच्या पत्रातून देखील मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते. वर्षानुवर्षे होत असलेल्या या चोरट्या प्रकारावर नियंत्रण मात्र येताना दिसत नाही. दिवसा आणि रात्रीही हा चोरटा धंदा बिनधास्तपणे करण्यात येत असतो. या वाळू चोरांनी चंद्रभागेचे मुळ आस्तित्व हरवून गेले आहे तर वाळूचोरीमुळे (Sand theft) झालेल्या मोठ्या खड्ड्यात प्राण देखील जात आहेत. रात्रीच्या वेळेस भरधाव वेगात वाहने पळवून वाळू नियोजित ठिकाणी पोहोच करणे देखील बिनधास्तपणे सुरु असते. पोलीस आणि महसूल प्रशासन कारवाई देखील करीत असते परंतु या बेकायदा प्रकार जराही कमी होताना दिसत नाही.
वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने आणखी एक कारवाई केली असून वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ११ लाकडी होड्यांचा अक्षरश: चुराडा करण्यात आला आहे. इसबावी हद्दीतील सांगोला जॅकवेलजवळ महसूल प्रशासनसाने आज जेसीबीच्या साहाय्याने ११ होड्या तोडून टाकल्या. सदर ठिकाणावरून वाळूचा चोरटा उपसा (Sand extraction) होत असल्याची माहिती मिळाल्याने महसूल विभागाच्या भरारी पथकाने येथे छापा टाकला असता त्यांना या होड्या आढळून आल्या. नदीत असलेल्या या होड्या पात्रातून काठावर आणण्यात आल्या आणि तेथे जेसीबीच्या मदतीने त्यांचा चुराडा करून जागेवरच त्या नष्ट करण्यात आल्या.
महसूल प्रशासनाने वाळू चोरी रोखण्यासाठी भरारी पथक तयार केले असून माहिती प्राप्त होताच आणि वरिष्ठांचे आदेश मिळताच हे पथक संबंधित ठिकाणी धाव घेऊन कारवाई करीत आहे. या पथकात नायब तहसीलदार, तीन मंडळ अधिकारी, सात तलाठी, कोतवाल यांचा सहभाग असतो. या पथकाला आज आदेश मिळताच इसबावी येथील सांगोला जॅकवेलजवळ भीमा पात्रात हे पथक पोहोचले आणि वाळू उपसा करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या अकरा होड्यांचा अक्षरश: चुराडा केला. ( Illegal sand extraction, The boats were destroyed ) यापूर्वीही अनेकादा अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
वाहनावर कारवाई होते आणि वाहने पकडली जातात म्हणून गाढवांच्या मदतीने भीमा नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक करून एका विशिष्ठ ठिकाणी जमा केली जाते आणि तेथून वाहनात भरून अपेक्षित ठिकाणी पोहोच केली जाते. हा प्रकार रात्रभर सुरु असतो आणि पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या जीवालाही धोका करीत ही वाहने बेफाम वेगाने धावत असतात. चोरटी वाळू वाहतूक करणारी गाढवे देखील अनेकदा पकडण्यात आली आहेत पण कुठलाच प्रकार थांबताना दिसत नाही.
हे वाचा : वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा :
- पंढरपूर हादरले, एकवीस तोळे सोन्याची चोरी !
- कोरोनाची चौथी लाट जून महिन्यात !
- आमदारांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल !
- पंढरीत वाळू उपसा करणाऱ्या अकरा होड्यांचा चुराडा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !