BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ मार्च, २०२२

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा !



औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात बऱ्याच घटना घडत असताना शिवसेना आमदार रमेश बोरणारे ( Shivasena Mla) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखला झाला असून पुन्हा एक नवी खळबळ उडाली आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध सातत्याने अधिकाधिक भडका घेत असल्याचे रोज पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या चौकशा, गुन्हे दाखल आणि अटक अशा कारणासाठीच राज्यातील राजकारण रोज चर्चेत येत आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादच्या वैजापूर येथील शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा  गुन्हा  दाखल झाल्याने मतदार संघातच नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यभर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. 


आमदार रमेश बोरणारे यांच्या विरोधात एका महिलेला मारहाण केली असल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पिडीतेच्या पुरवणी जबाबावरून विनयभंगाचे कलम लावण्यात आले असून यामुळे शिवसेना आमदार बोरणारे अधिक अडचणीत येताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमास गेल्याच्या रागातून आमदार बोरणारे यांनी आणि इतर काही जणांनी महिलेस शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली असा आरोप आमदार बोरणारे यांच्यावर करण्यात आला होता. 


पोलिसांनी आमदार बोरणारे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता परंतु पोलिसांनी या प्रकरणात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला नव्हता. आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करताना विनयभंगाचे कलम लावले गेले नव्हते. यामुळे पोलीसंच्यावर देखील टीका होऊ लागली होती. आमदार बोरणारे हे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना विनयभंगासारखे गंभीर गुन्ह्याचे कलम लावण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याची चर्चाही सुरु होती पण आता पुरवणी जबाबातून हे कलम लावण्यात आले आहे Filed a case of molestation against an MLA) त्यामुळे देखील खळबळ उडाली आहे. 


असे आहे प्रकरण !  

ज्या महिलेने आ. बोरणारे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही पिडीत महिला भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमास गेल्या होत्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा कार्यक्रम होता. त्यामुळे आ. बोरणारे यांनी आणि अन्य काही जणांनी मिळून आपणास मारहाण केली असल्याचा आरोप पिडीत महिलेने केला. त्यानुसार वैजापूर पोलिसांनी आ. बोरणारे यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आमदार यांचे स्वीय सहाय्यक यांनी भांडण सोडवत असताना आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून सदर महिलेच्या विरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता महिलेच्या पुरवणी जबाबावरून आमदार बोरणारे यांच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हे वाचा : वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !