मुंबई : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत घोषणा केलेले पन्नास हजार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु याबाबत आता अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांच्या खिशात हे पन्नास हजार येणार हे स्पष्ट झाले आहे.
अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी केलेल्या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी आनंदित झाला होता. पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार असे सांगितले गेले होते पण ते नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत याबाबत शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले असून ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यास ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत ही मदत नेमकी कुणाला मिळणार आणि त्यासाठी काय अटी, नियम असणार आहेत याची माहिती अनेकांना नव्हती. त्यामुळे अजित पवार यांनीच याबाबत आता सविस्तर सांगितले आहे.
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या घोषणेचा लाभ मिळणार आहे. २०१७-१८, २०१८-१९, आणि २०१९-२० या वर्षात घेण्यात आलेल्या पीक कर्जाची ३० जून २०२० पर्यंत नियमित परतफेड केलेल्या २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेवर सदर ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्याने २०१८-१९ मध्ये पीक कर्ज घेतले पण त्यांची रक्कम ५० हजाराहून कमी आहे त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत दिली जाणार आहे. वास्तविक याबाबत महाविकास आघाडी सरकारने आधीच ही घोषणा केली होती पण कोरोना आणि शासनाची आर्थिक स्थिती यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नव्हती.
संभ्रम दूर !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त करण्यात आले होते पण शेतकरी संभ्रमात होते. पन्नास हजारांची ही रक्कम नक्की कुणाला मिळणार आणि त्यासाठी काय अटी, नियम असतील याची उत्सुकता शेतकऱ्यांना होती. कोणत्या कालावधीत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणि कधी ही मदत दिली जाणार आहे असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि यामुळे संभ्रम होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आता हा संभ्रम दूर केला आहे.
लाखो शेतकरी लाभार्थी !
नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेबाबत पुढील मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना कालावधी आणि राज्याची आर्थिक परिस्थिती यामुळे अडकलेली ही रक्कम मिळण्याचा मार्ग आता खुला झाला असून राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शासनाने १० हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे. त्यामुळे ही रक्कम मिळण्यातील सगळ्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. ( Fifty thousand incentives for farmers) लवकरच सदर रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे.
महिलांचा सहभाग
राज्यातील शेतकरी महिलांच्या संदर्भात देखील राज्य शासनाने महत्वाचे अनेक निर्णय घेतले असून शेतकरी महिलांचे सक्षमीकरण करण्यास प्राथमिकता दिली जाणार आहे. शेतकरी महिलांचा योजनेत असलेला ३० टक्के सहभाग वाढवून तो ५० टक्केपर्यंत करणायत येणार आहे त्यामुळे कृषी क्षेत्रातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
हे देखील वाचा : पंढरपूरच्या 'त्या' सायबाला अटक !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !