नवी दिल्ली : कोरोनाचे संकट टळत असल्याचे दिसत असतानाच कोरोनाने चीनमध्ये हाहा:कार माजवला असून केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा एकदा अलर्ट ( Corona Virus) करून सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाली असून येत्या काही दिवसात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल अशी आजची परिस्थिती असतानाच चौथी लाट (Corona Forth Wave) येण्याची चर्चा सुरु झालीय आणि आता तर केंद्र सरकारनेच अलर्ट दिला आहे त्यामुळे पुन्हा चिंतेचे ढग जमू लागले आहेत. चीन, आग्नेय आशियात आणि युरोपमधील काही देशात कोरोनाची नवी लाट आल्याने भारत सरकार संवाद झाले आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याना याबाबत इशाराच दिला आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट परतत असल्याचा आनंद फार काळ टिकणार नाही असेच संकेत मिळू लागले आहेत. (The fourth wave of corona will come in
देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या चिंताजनक नाही असा विचार करीत देशातील कोणत्याची राज्याच्या सरकारने आणि प्रशासनाने बेफिकीर राहू नये, कोरोनाबाबत सतर्क राहावे आणि चाचणी, रुग्णांचा शोध, उपचार, लसीकरण आणि अनुकूल वर्तन या पंचासुत्रीचे पालन करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशात कोरोनाची नवीन लाट दिसून येत आहे. आरोग्यमंत्र्यांनी १६ मार्च रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली असून राज्यांनी जीनोम सिक्वेन्सिंगवर काम करावे (Notice from Central Government to States) आणि कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
चीनमध्ये हाहा:कार !
चीनमध्ये अचानकपणे कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला असून तेथे लॉकडाऊन करण्यात येत आहे. चीनसोबत अनेक देशात कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिएंट ची लाट वाढताना दिसत आहे त्यामुळे चीनमधील विविध शहरात लॉकडाऊन सुरु कार्नाय्त आले आहे. पुढील दोन आठवडे हे अत्यंत महत्वाचे मानले जात असून दोन आठवड्यात नियंत्रण आणता आले नाही तर चीनमध्ये भयानक विध्वंस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी तास इशाराच दिलेला आहे त्यामुळे चीनच्या शेजारीच असलेल्या भारताला अधिक सावध राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सतर्कतेचा सूचना !
शेजारी राष्ट्र असलेल्या चीनमधील परिस्थिती भयंकर बिघडू लागल्याने भारताला दक्ष राहणे अत्यावश्यक बनले असून देशातील नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी सल्ला देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात यावे तसेच नागरिकांनी मास्क चा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीत परस्परांपासून अंतर ठेवून राहावे, स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष दिले जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मागील महिन्यात केंद्र शासनाने राज्याकडून आर्थिक उपक्रम सुरु करण्याची सूचना केलेली होती ती तशीच सुरु ठेवावी पण कोरोनाच्या बाबतीत आता गाफील राहू नये असे केंद्राने राज्यांना (Corona Alert) सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !