सोलापूर : अलीकडेच बोरामणी येथे पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणी सोलापूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. (Solapur Crime) धक्कादायक म्हणजे ऊस तोडणी करणाऱ्या कामगारानीच हा दरोडा घातला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे पडलेल्या दरोड्याने सोलापूर जिल्हा हादरला होता आणि पोलिसांच्या पुढे या तपासाचे मोठे आव्हान उभे होते. अखेर सोलापूर पोलिसांनी परिश्रम करून या दरोड्यातील आठ आरोपीपैकी सहा आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले असून पोलिसांचे उदंड कौतुक होऊ लागले आहे. बोरामणी जवळ हिरजे वस्ती येथे टाकलेल्या दरोड्यात बाबुराव हिरजे या वृद्धाचा खून करण्यात आला होता आणि त्यांच्या घरातून ७५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. ( Big robbery in solapur District) त्यांच्या पत्नी देखील या घटनेत जखमी झालेल्या होत्या.
सहा जण गजाआड !
बोरामणी दरोड्यातील आठ आरोपीपैकी सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीच आज पत्रकार परिषदेत दिली आहे. दरोडेखोरांच्या या टोळीचा म्होरक्या वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे ( रा. फकराबाद, जिल्हा अहमदनगर ) अजय देवगण उर्फ देवगण सपा शिंदे (शेळगांव, परांडा), सुनील उर्फ गुल्या सपा शिंदे (शेलगाव, परांडा) ज्ञानदेश्वर लिंगू काळे (पांढरेवाडी, परांडा) विकास नागेश भोसले ( डोकेवाडी ता. भूम) आणि त्यांना घेऊन आलेला चालक संतोष झोडगे ( डोकेवाडी, ता. भूम ) यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. (Boramani robbery accused sugarcane harvesters) यातील काही आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.
ऊस तोडणी कामगार !
दरोडेखोरांची संख्या आणि दरोड्याची तीव्रता पाहता तसेच दरोड्यावेळी झालेल्या खुनामुळे सराईत गुन्हेगारांनी हा दरोडा घातला असेल असे वाटत होते परंतु बोरामणी दरोडा टाकणारे हे चक्क ऊसाची तोडणी करणारे कामगार असल्याचे समोर आले आहे. सर्वच्या सर्व आरोपी हे ऊस तोड करणारे कामगार असून सगळे आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. काही महिन्यापूर्वी या आरोपींनी दर्गनळळी परिसरात ऊसतोड देखील केली आहे. ही ऊंसतोड करीत असतानाच त्यांनी पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे नियोजन केले होते.
दोघांचा शोध सुरु !
बोरामणी दरोड्यातील आठ पैकी सहा आरोपी अटक झालेले असून त्यातील दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपळगाव तर्क. जामखेड येथील अक्षय काळे, आणि डोकेवाडी ता, भूम येथील अनुज उर्फ नागनाथ भोसले यांचा शोध सुरु असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माहिती ठेवणार !
इतर जिल्हयातून ऊसाची तोडणी करण्यासाठी सोलापूर जिल्हयात येणाऱ्या कामगारांची माहिती पोलीस ठेवणार असून संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी संबंधित ठेकेदार यांच्याकडून सर्व कामगारांची नावे आणि मोबाईल क्रमांक घ्यावेत अशा सूचना यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आहेत. शिवाय ग्राम सुरक्षा यंत्रणा देखील सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
बक्षीस दिले जाणार !
जिल्ह्याला हादरा देणाऱ्या या दरोड्यातील आरोपीचा शोध घेणाऱ्या पोलीस पथकाला प्रोत्साहनपर बक्षीस मिळावे यासाठी पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे एक प्रस्ताव पाठवला जाणार आहे. अत्यंत कमी वेळेत पोलिसांनी या मोठ्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना जेरबंद देखील केले यामुळे जिल्हयातून पोलिसांचे ( Solapur Police) कौतुक होऊ लागले आहे.
हे देखील वाचा :
- पंढरीत चौकीदारच बनला चोर, सोळा लाखांचा गंडा !
- बायको प्यायली दारू, नवऱ्याने घातली डोक्यात कुऱ्हाड !
- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग !
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !