चाळीसगाव : पत्नी दारू पिल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने उचलली कुऱ्हाड आणि बायकोच्या डोक्यात घातली. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडताच शेतात (Wife's Murder) जाऊन लपून बसला अशी थरारक घटना तालुक्यातील मेहूणबारे गावात घडली.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावात एका शेतकऱ्याकडे काम करण्यासाठी मध्य प्रदेशातून कुवरसिंग चतरसिंग पावरा हा आपली पत्नी आणि तीन मुलांना घेऊन आलेला होता. एक वर्षापासून तो आपल्या कुटुंबासह शेतातील शेड मध्येच रहात होता. त्याची दोन मुले आणि एक मुलगी होळीच्या निमित्ताने आपल्या गावी मध्य प्रदेशात गेले होते. त्यानंतर येथे तो आपली पत्नी निनुबाईसह रहात असताना दारू पिण्याच्या कारणावरून दोघात भांडण सुरु झाले आणि याचे पर्यवसान पत्नीचा खून होण्यात झाले.
उचलली कुऱ्हाड आणि --
कुवरर्सिंग याची पत्नी निनुबाई ही दारू पिलेली असल्याचे दिसले आणि दोघांत जोराचे भांडण सुरु झाले. दारू पिल्याच्या रागातून त्याने पत्नीला जाब विचारायला सुरुवात केली. पत्नी दारू पिल्याचे कुवरर्सिंगला सहन झाले नाही त्यामुळे त्याने निनुबाईला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लाथा बुक्क्याने मारणाऱ्या कुवरसिंग याचा संताप वाढतच गेला आणि त्याने कुऱ्हाड उचलली आणि थेट निनुबाईच्या डोक्यात घाव घातला. कुऱ्हाडीच्या घाव डोक्यात बसताच निनुबाई जमिनीवर कोसळली. (Wife dink alcohol, murder by husaband) मोठ्या प्रमाणत रक्तस्त्राव होऊ लागला. सुरुवातीला त्याने पत्नीच्याच साडीने रक्त पुसण्याचा प्रयत्न केला पण रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ लागल्याने तो तेथून पळाला.
बतावणी केली पण --
आपल्या हातून काय घडलेय याची जाणीव त्याला सगळे काही घडून गेल्यावर झाली होती. रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला पण आता त्याची तारांबळ उडाली होती. काहीसा विचार करून कुवरसिंग तेथून पळत सुटला तो थेट गावात जावून शेताच्या मालकाचे घर गाठले. निनुबाईला काहीतरी झाले आहे, ती बोलत नाही अशी बतावणी करू लागला. इतर नातेवाईकांना देखील त्याने अशाच प्रकारे बतावणी केली. शेताचे मालक तसेच अन्य काही गावकरी धावत शेतात आले आणि त्यांना धक्का बसला. निनुबाई पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली असल्याचे त्यांना दिसले.
अखेर गुन्हा दाखल !
रागाच्या भरात पत्नीचा खून करून "आपण त्या गावाचे नाहीच" असे भासविणाऱ्या कुवरसिंगने केलेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे लगेच याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आणि कुवारसिंग याच्याविरोधात पत्नीचा खून केल्याचा गुन्हा दाखल झाला. ((Wife murdered under the influence of alcohol) निनुबाईचे दारू पिण्याने तिचा जीव गेला, पती कुवरसिंग तुरुंगात गेला आणि तीन मुले पोरकी झाली.
हे देखील वाचा :

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !