पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन येत्या गुढीपाडव्यापासून सरू करावे या मागणीसाठी आज भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने पंढरीत (Vitthal Mandir) भजन आंदोलन केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून राज्यातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा तिसरी लाट आली त्यामुळे निर्बंध कमी अधिक प्रमाणात लागू करण्यात आले होते. मंदिरांची दारे पर्णपणे बंद होती परंतु कोरोनाची तीव्रता कमी होऊ लागताच मंदिरे सुरु करण्यात आली आहेत तथापि विठ्ठल मंदिरात पदस्पर्श दर्शन मात्र सुरु करण्यात आले नाही. भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले पण भविकांना मुखदर्शनावर समाधान मानावे लागत आहे. पदस्पर्श दर्शन होत नसल्यामुळे भाविकांची नाराजी असली तरी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठीच पदस्पर्श दर्शनाला परवानगी देण्यात आली नाही .
दोन वर्षे मंदिर बंद होते परंतु राज्यातील भाविकांनी मोठ्या मनाने परिस्थिती समजून घेतली. जनतेच्या आरोग्यासाठीच शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे वारकरी संप्रदायाला मान्य होते परंतु मंदिर उघडण्यासाठी देखील राजकारण सुरु झाले आणि काही आंदोलने झाली. अर्थात या आंदोलनाचा काहीही उपयोग झाला नाही आणि आंदोलनामुळे मंदिरे खुली देखील करण्यात आली नाही. वारकरी संप्रदायाचा या आंदोलनात सहभाग नव्हता त्यामुळे ही आंदोलने ( BJP ) परिणामकारक ठरू शकलेली नव्हती.
कोरोनाच प्रभाव कमी होत असताना मुखदर्शन सुरु करण्यात आले परंतु पदस्पर्श दर्शन नसल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे. पदस्पर्श दर्शन सुरु व्हावे ही भाविकांची देखील अपेक्षा आहे. हीच मागणी घेवून भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली आज भजन आंदोलन करण्यात आले (Warakaris' movement) आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
भाजप अध्यात्मिक आघाडीने विठ्ठल मंदिराला प्रदक्षणा घालून नामदेव पायरीजवळ भजन आंदोलन केले आणि मंदिर समितीला मागणीचे एक निवेदन सादर करण्यात आले. देशातील सगळीच मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आलेली असून येत्या गुढीपाडव्याच्या दिवसापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरु करावे, देव आणि भाक्तींची भेट घडवून द्यावी ( Padasparsha Darshan of Vitthal should be started) अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !