BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ मार्च, २०२२

सोलापूर - गाणगापूर रस्त्यावर भीषण अपघातात पाच भाविक ठार !

 



सोलापूर : अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावर झालेल्या अत्यंत भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्घटना घडली आहे.  ( five dead in accident)


मिळालेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार अक्कलकोटकडून  गाणगापूरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच भाविक ठार झाले आहेत. ठार झालेल्या पाच जणांत चार महिला भाविक आणि कारचालक यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. हे भाविक एम एच १६ बी एच ५३९२ या क्रमांकाच्या कारने गाणगापूर येथे देव दर्शन करून परत अहमदनगरकडे  निघालेले होते.  चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.  या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार महिला या अहमदनगर येथून एका कारने आलेल्या होत्या आणि देवदर्शन करून त्या परतत असताना कार झाडावर आदळून ही दुर्घटना घडली.  (solapur-ganagapur road accident)


सदर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार महिला आणि कार चालक अशा पाचही जणांचे मृतदेह कर्नाटकमधील अफझलपूर येथील शासकीय रुग्णालयात शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला असून या घटनेबाबत पुढील तपास अफझलपूर पोलीस करीत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पाच मृतात चार भाविक महिला असल्याने प्रचंड हळहळ  व्यक्त करण्यात येत आहे.  


अफझलपूर तालुक्यातील बळूर्गी गावाजवळ झालेल्या या अपघातात बाबासाहेब सखाराम वीर (५४), त्यांच्या पत्नी छाया बाबासाहेब वीर (५०) या दोघांसह त्यांच्या मुली कोमल बाबासाहेब वीर आणि राणी बाबासाहेब वीर, हिरा बाडे यांचा मृत्यू झाला असून चैताली दिनकर सूर्यवंशी, सायली बाबासाहेब वीर आणि तीन वर्षे वयाची ममनी हे जखमी झाले आहेत. जखमींना अफझलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


हे देखील वाचा (बातमीवर क्लिक करा )


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !