BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मार्च, २०२२

शेती नको, शेतकऱ्यांना वाईन विक्रीची परवानगी द्या !

 



भंडारा :  'तोट्यातली शेती नको आता, वाईन विक्री करण्यासाठी परवानगी द्या !' अशी मागणीच एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. Allow farmers to sell wine ) 


शेतकरी सतत विविध संकटांच्या मालिकेत अडकलेला असतो. त्यात आर्थिक संकटातून त्याला बाहेर पडता येत नाही आणि यातूनच अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलतात. कितीही कष्ट केले तरी शेती परवडत नाही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थार्जन होत नाही त्यामुळे काही शेतकरी अनुचित मार्गाचा देखील अवलंब करतात. अलीकडे शेतात अफू, गांजा अशी लागवड केल्याचे आढळून येऊ लागले आहे. असा बेकायदेशीर मार्ग निवडला की त्यातून आणखी नव्या संकातालाच निमंत्रण मिळते, तरीही काही शेतकरी अशा मार्गाला जाताना दिसतात. 


अलीकडे सोलापूर जिल्यातील मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजा लागवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. हा विषय जिल्हाभर चर्चिला गेला होता. आता भंडारा जिल्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाईन विक्रीची परवानगी देण्याची मागणी केली आहे. 'मुख्यमंत्रीसाहेब, गेल्या अनेक वर्षांपासून शेती तोट्यात आहे, शेती परवडत नाही त्यामुळे वाईन विक्रीसाठी परवानगी द्यावी, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली तशी आम्हा शेतकऱ्यांनाही परवानगी द्यावी' अशी मागणी मोहाडी तालुक्यातील निलज बु. येथील जयगुनाथ गाढवे यांनी केली आहे. (Demand of farmers)  


शेती भुईसपाट !
गाढवे राहत असलेल्या निलज बु. गावाच्या परिसरात मागील वर्षी आलेय चक्रीवादळाने शेती भुइसपाट केली होती आणि पंचनामे झाले पण प्रत्यक्षात मदत मिळालीच नाही त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या या शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे. वादळाने मोठे नुकसान झाले, शासनाकडून मदत मिळेल या आशेवर शेतकरी बसले. नुकसानीचे पंचनामे देखील झाले पण अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. 

खर्च भागवू कसा ?

चक्रीवादळाने पिके तर हातची गेली, मागील वर्षांपासून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा बोनसही बंद केला. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शाळेचा खर्च, कुटुंबाच्या औषध पाण्याचा खर्च कसा भागवायचा ? असा सवाल जयगुनाथ या शेतकऱ्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.  या संकटातून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांना वाईन विक्री करण्यास परवानगी द्यावी असे त्यांनी म्हटले आहे. 


-- मग आम्हाला का नाही ?

किराणा दुकानदारांना वाईन विक्री करण्यासाठी परवानगी दिली जात असेल तर आम्हा शेतकऱ्यांना का नाही ? शेती परवडत नाही, कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे आता आपणास वाईन विक्री करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे शेतकरी गाढवे यांनी केली असून त्यांनी हे पत्र स्पीड पोष्टाने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या पत्राची चांगलीच चर्चा आता होऊ लागली आहे . (Letter to the Chief Minister)
  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !