BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ फेब्रु, २०२२

युक्रेनमध्ये अडकलेले पंढरपुरचे विद्यार्थी सुखरूप !

 




पंढरपूर : युद्धपरिस्थितीमुळे युक्रेन येथे अडकून पडलेले पंढरपूर तालुक्यातील चारही विद्यार्थी सुखरूप असून ते मायदेशी परत येण्याच्या तयारीत आहेत. 


रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाईमुळे युक्रेनमधील परिस्थिती अंत्यत बिकट झालेली असताना अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. भारतापेक्षा कमी खर्चात आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे  भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथे जात असतात. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली असून अनेक भारतीय तेथे अडकल्याची आहेत.  यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी असून जिल्हा प्रशासन याबाबत अधिकची माहिती प्राप्त करीत आहे. 


पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील विश्वास ज्योतिराम बोंगे, रोपळे येथील वेदांत बाळासाहेब पाटील, पंढरपूर येथील वैष्णवी दिलीप कदम आणि प्रसाद शिंदे नाईक हे युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. युक्रेनमधील युद्धाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे लक्षात येताच या विद्यार्थ्यांनी मायदेशात परतण्यासाठी विमानांची तिकिटे देखील काढली होती. २४ आणि २७ अशा तारखांची तिकिटे असताना या तारखेच्या आधीच परिस्थिती अधिक बिघडली आणि विमानसेवा बंद पडली त्यामुळे त्यांना मायदेशी परत येत आले नाही.    


युक्रेनमधील युद्ध परिस्थिती अधिकच चिघळू लागल्याने या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त करण्यात येत होती.  पंढरपूर तालुक्यातील सदर विद्यार्थी युक्रेनमध्ये सुखरूप असल्याचा संदेश या विद्यार्थ्यांनी पंढरपूर तालुक्यातील आपल्या पालकांना दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या सुखरूपतेची माहिती मिळताच अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे तथापि लवकर भारतात परतण्याची त्यांची व्यवस्था भारत सरकारने लवकर करावी अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. पंढरपूर तालुक्यातील चौघांपैकी वैष्णवी कदम आणि वेदांत पाटील हे भारतीय दूतावासाच्या मदतीने रोमानिया येथून भारतात येण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. विमानसेवा बंद असली तरी बसची मदत घेत युक्रेनच्या सीमा ओलांडून ते मोलडोवा येथे येणार आहेत आणि तेथून विमानाने ते मायदेशी परत येतील. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !