सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक माहिती समोर येत असून कोरोनाचा संसर्ग आता कमी होत चालला आहे तथापि मृत्यूंची संख्या मात्र वाढलेली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये मात्र तिसऱ्या लाटेतही पंढरपूर आघाडीवरच आहे.
कोरोनाची तिसरी लाट गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहिली आहे. ही लाट येईल की नाही याबाबत देखील मतमतांतरे होती परंतु चोरपावलाने तिसरी लाट आली आणि मनामनात पुन्हा एकदा धास्ती निर्माण झाली. पहिल्या आणि विशेषत: दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान केले होते त्यामुळे तिसरी लाट किती भयावह असेल याची चिंता सर्वांनाच लागलेली होती परंतु फारशी तीव्रता नसलेली ही तिसरी लाट देखील आता ओसरताना दिसत असून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. जिल्ह्याला हा एक मोठा दिलासा लाभलेला आहे. मृतांची संख्या मात्र फारशी कमी होताना दिसत नाही हा एक चिंतेचा विषय आहे. २१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८ तर सोलापूर शहरातील १९ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
सोलापूर शहरात २ हजार ११ रुग्ण सक्रीय आहेत तर ग्रामीण भागात ही संख्या २ हजार १६ एवढी आहे. यात पंढरपूर तालुका सर्वाधिक आहे. मागील दोन्ही लाटेत सोलापूर जिल्ह्यात रुग्णांची सर्वाधिक संख्या पंढरपूर तालुक्यातीलच होती आणि सर्वाधिक मृत्यू देखील पंढरपूर तालुक्यातच झाले आहेत. आता तिसऱ्या लाटेतही पंढरपूर तालुका पुढे असून येथल सक्रीय रुग्णांची संख्या ४३८ आहे. पंढरपूर तालुक्याच्या खालोखाल बार्शी तालुका असून येथील सक्रीय रुग्णांची संख्या ३७४ एवढी आहे. माढा आणि माळशिरस तालुक्यात प्रयेकी २२७, सांगोला तलुइक १७९, करमाळा १५५ आणि मोहोळ तालुक्यात १४५ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शहरात सध्या दोन हजार ११ सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीणमधील सक्रिय रुग्णांची संख्या आता दोन हजार १६ झाली आहे. अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या तालुक्यांमधील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ४३८ तर बार्शी तालुक्यात ३७४, माळशिरस व माढा तालुक्यात प्रत्येकी २२७, सांगोल्यात १७९, करमाळ्यातील १५५ तर मोहोळ तालुक्यातील १४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून सतत करण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यापही लाखो नागरिक लसीपासून दूर आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !