सोलापूर : थंडीची लाट ओसरताना दिसत असतानाचा उन्हाळ्याची चाहूल लागू लागली असून सोलापूरचा पारा सर्वाधिक चढू लागला आहे.. सोलापूरचा पार ३५ अंशावर पोहोचला असल्याने यंदाचा उन्हाळा अधिक कडक जातोय की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
नाही नाही म्हणत यावर्षी हिवाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्र गारठला. राज्याच्या काही भागात तर थंडीची तीव्र लाट आली. गेल्या काही दिवसापासून देशाच्या विविध भागासह राज्यातही थंडी वाढली असून तापमानात मोठी घट होताना पाहायला मिळाले. फेब्रुवारी महिना सुरु झाला तरी हवेत मोठा गारवा असल्याने यंदा उन्हाळा येणार आहे की नाही ? असे टोमणे सोशल मीडियावर पाहायला मिळू लागले होते पण आता येऊ घातलेल्या उन्हाळ्याची चाहूल लागू लागली असून सोलापूर येथील तापमान ३५ अंश सेल्सियसवर नोंदले गेले आहे. त्यामुळे आता उन्हाळा सुरु झाल्याची जाणीव तर झालीच आहे पण यंदा उन्हाळा अधिक कडक होण्याची भीती देखील व्यक्त होऊ लागली आहे.
महाराष्ट्रात कमाल आणि किमात तापमानात वाढ होताना दिसत असून राज्यातील किमान तापमान दहा अंशाच्या पुढे गेले आहे. उत्तर महाराष्ट्रात अजून तेवढा परिणाम दिसला नाही. सोलापुरात दरवर्षी कडक उन्हाळा असतो आणि येथील तपमानात मोठी वाढ होत असते. आजही कमाल आणि किमान तपमानातील वाढ कायमच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान तज्ञ होसाळीकर यांच्या माहितीनुसार काल दोन फेब्रुवारी रोजी सोलापुरात कमाल तपमान ३५.४ एवढे होते. कोल्हापूर ३३.३, पुणे ३३.६, नाशिक ३२.१ तर नांदेड येथे ३४ अंश सेल्सियस एवढ्या तपमानाची नोंद करण्यात आली.
राज्यात अजूनही हवामान थंड असले आणि गारवा जाणवत असला तरीही किमान तापमानात वाढ झाली आहे. निफाड ६.८, परभणी ८.२, धुळे ८.८ तर जळगाव येथे ९.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान ३२ अंशाच्या पुढे गेले आहे परंतु सोलापूर येथे मागील चोवीस तासात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरचा पार ३५ अंशावर पोहोचला आहे तथापि दिवसा आणि रात्रीत किमान तपमानात १२ ते २५ अंश सेल्सीयसची तफावत आढळली आहे. तापमान वाढू लागले असले तरी देशाची काही भागात गारपीठ, पाऊस , हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. सोलापूरचा पारा मात्र सर्वाधिक वाढताना दिसत असून सुरुवातीपासूनच सोलापूर तापमानात उच्चांकी वाढ दिसून आली आहे.
............

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !