पुणे : जेलमध्ये जाणार असे सांगितले गेलेले लोक भाजपात कसे ? असा मार्मिक सवाल राष्टवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला असून यामुळे भाजपची कोंडी झाली असून किरीट सोमय्या काय उत्तर देणार याकडे आता लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या नेत्यांना तुरुंगात डांबण्याची भाषा देखील केली जात होती परंतु भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपात दाखल झाले आणि पुन्हा हे आरोप हवेत विरले असे अनेक प्रकार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राने पहिले आहेत. अन्य पक्षात असताना भ्रष्ट असलेले नेते भाजपात गेले की स्वच्छ कसे होतात असे सवाल देखील अनेकदा विचारण्यात आले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या सतत अन्य पक्षातील नेत्यांच्याबाबत भ्रष्टाचाराच्या तक्रारी करतात पण स्वपक्षीयांच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करतात असे आरोपही अलीकडे सतत होत आहेत. अशाच विषयातून पुण्यात किरीट सोमय्या यांना कथित धक्काबुकीची घटना घडली असल्याचे दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेत कोविड रुग्णालयाच्या कथित भ्रष्ट्राचाराबाबत निवेदन देण्यासाठी सोमय्या गेले असताना शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारला. पुणे मनपामध्ये भाजपची सत्ता आहे आणि तेथील भ्रष्टाचाराबाबत का बोलत नाही ? असा सवाल शिवसैनिक विचारत होते यावेळी शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला तर सोमय्या हे स्वत: पाय घसरून पडले असल्याचे शिवसेनेचे अनिल परब यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मात्र नेमके वर्मावर बोट ठेवले आहे.
पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून तेथील भ्रष्टाचाराचे निवेदन घ्यायला किरीट सोमय्या एवढे का घाबरत आहेत? तिथल्या भ्रष्ट कारभारावर बोलायला कशाची भीती वाटते? असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. याच वेळी 'तुम्ही आरोप केलेले लोक जेलमध्ये जाणार होते, ते सर्व भाजपात कसे गेले ? ये पब्लिक है सब जानती है ' असे ट्वीट त्यांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोमय्या नेहमी आरोप करीत असतात. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले अनेक नेते भाजपमध्ये काय करीत आहेत ? असा थेट सवालच रुपाली पाटील यांनी विचारला आहे. याआधी देखील सोमय्या यांना असे सवाल विचारण्यात आलेले आहेत. भाजपमधील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर सोमय्या कधीच काही आरोप कसे करीत नाहीत, कधीच त्याबाबत आवाज उठवत नाहीत याची चर्चा सामान्य जनतेत देखील सुरु आहे.
हे देखील वाचा :>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !