नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम किसान ट्रॅक्टर योजनेच्या अंतर्गत कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत उपलब्ध होत असून गरजू शेतकऱ्यास याचा मोठा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सतत कुठल्या ना कुठल्या योजना आणल्या जातात आणि त्याचा शेतकरी बांधवाना मोठा फायदा देखील होत असतो. केंद्र सरकारने आता पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरु केली असून शेतकऱ्याला याचा चांगला लाभ होणार आहे. बैलांच्या मदतीने शेती करण्याचे दिवस आता जवळपास संपुष्टात आले असून बहुतेक शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करताना दिसतात. सधन शेतकऱ्याच्या दारात आणि शेतात ट्रॅक्टर दिसतात पण गरजेचा असूनही सामान्य शेतकऱ्याला तो परवडत नाही.
ट्रॅक्टरसह विविध यंत्रांचा वापर आता शेतीत होऊ लागला आहे परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यास ट्रॅक्टर विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेतीच्या कामात अडचणी निर्माण होतात आणि त्याची प्रगती होताना दिसत नाही. छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेणे हे आवाक्याबाहरेचे ठरत असते. परंतु आता त्यांना देखील ट्रॅक्टरची खरेदी करणे सुलभ होणार आहे. बैलाचा वापर करून पारंपारिक पद्धतीने शेती करणे आता कठीण असले तरी आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या शेतकऱ्यास ट्रॅक्टर खरेदी करणे अशक्य असते त्यामुळे अशा शेतीची देखील प्रगती खुंटताना दिसते.
ट्रॅक्टर विकत घेणे अशक्य असलेल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक योजना आणलेली असून या शेतकऱ्यांना आता इतरांकडून भाड्याने ट्रॅक्टर आणून शेतीची कामे करण्याची गरज उरणार नाही. अजूनही अनेक शेतकरी बैलाच्या साहाय्याने शेती करीत असतात त्यांच्यासाठी देखील ही योजना अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी या योजनेतून मोठी सबसिडी दिली जाणार आहे त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनाही आता ट्रॅक्टर खरेदी करणे सुलभ होणार आहे. ट्रॅक्टरद्वारे शेती करून उत्पादन वाढीला देखील मदत होणार आहे. 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' या नावाने ही सबसिडी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सदर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर दिले जाणार आहेत. केंद्र शासनाकडून या योजनेत शेतकऱ्यास ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकरी कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकणार आहे. शेतकऱ्याने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरची अर्धी रक्कम शासन अनुदान म्हणून देत असल्याने शेतकऱ्यास मूळ किमतीच्या अर्धीच किंमत देऊन ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. या योजनेच्या व्यतिरिक्त देखील काही राज्य सरकारे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना २० ते ३० टक्के अनुदान देत असते. केंद्र शासनाच्या योजनेत तर ट्रॅक्टरची अर्धी किंमत सरकार देत आहे त्यामुळे शेतकरी बांधवास याचा मोठा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना एक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यास एक अर्ज करावा लागणार आहे. आधार कार्ड, जमिनीचा सात बारा उतारा, बँक पास बुक, बँक स्टेटमेंट अशा काही कागदपत्रांची तसेच पासपोर्ट आकारातील फोटोंची पूर्तता करावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली की ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या किमतीतील निम्मी किंमत अनुदान स्वरूपात शासनाकडून प्राप्त होणार आहे. यामुळे छोट्या शेतकऱ्याला देखील आता ट्रॅक्टर खरेदी करता येणार असून त्याद्वारे आपल्या शेतीची कामे त्याला सहजपणे करणे सोईचे होणार आहे. गरजू शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !