BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ फेब्रु, २०२२

राष्ट्रवादीचा स्वागताचा फलक फाडला, कार्यकर्ते संतापले !

 



मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचा फलक फाडल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून अनगर येथील चौघांच्या विरोधात मोहोळ पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. 


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात विविध तालुक्यात फ्लेक्स लावण्यात आले होते.  राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचे प्रतिबिंब यातील काही फ्लेक्सवर उमटले होते आणि काही पदाधिकारी यांचे फोटो डावलून गटबाजीचे प्रदर्शन देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. एकीकडे हा अंतर्गत कलह उघडपणे दिसत होता तर दुसरीकडे स्वागताचे फ्लेक्स फाडण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यात समोर आला आहे. 


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मोहोळ येथे आढावा बैठकीसाठी येणार असल्याने स्थानिक पातळीवर पाटील यांचे स्वागत करण्यात येत होते. जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या समर्थकांनी मोहोळ ते अनगर पाटी या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करणारे फ्लेक्स लावलेले होते. स्वागतासाठी लावलेला फ्लेक्स फाडलेल्या अवस्थेत दिसून आला त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते संतप्त झाले.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, उमेश पाटील यांचे प्रमुख फोटो या फलकावर होते. उमेश पाटील यांचा फोटो असलेल्या ठिकाणी हे फ्लेक्स फाडण्यात आलेले दिसून आले. 


सदर प्रकरणी फुलचंद सरवदे यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दिली. अनगर येथील सोमनाथ हरी वाघमारे आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांनी हा फ्लेक्स फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून त्यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून मोहोळ पोलिसांनी सदर चौघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फलक फाडण्यात आला असल्याचे राजकीय वर्तुळात देखील याची मोठी चर्चा झाली असून हा राग नक्की कुणावर आहे ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !