राज्य शासनाने आजपासून काही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केलेले आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाली असल्याने राज्य शासनाने निर्बंधात शिथिलता आणली आहे. तथापि ज्या जिल्ह्यात अधिक लसीकरण झाले आहे अशा जिल्ह्यानाच या निर्णयाचा फायदा झाला आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनीही आज एक आदेश काढला असून त्याद्वारे सोलापूर जिल्ह्यात (महानगरपालिका हद्द वगळून ) अंशत: निर्बंधात शिथिलता दिली आहे.
ऑनलाईन तिकिटांची सुविधा उपलब्ध असलेले सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार खुली राहतील तथापि सर्व अभ्यागतांचे लसीकरण असणे आवश्यक आहे तसेच अभ्यागतांच्या संख्येवर नियंत्रण आवश्यक आहे . ऑनलाईन तिकिटांची सुविधा असलेलील सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेनुसार खुली राहतील परंतु अभ्यागतांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. ब्युटी पार्लर आणि केश कर्तनालय यांना लागू केलेल्या निर्बंधाप्रमाणे स्पा सेंटर ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील, अंत्यसंस्कार/अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संखेवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शिथिल केलेल्या या निर्बंधाव्यतिरिक्त इतर मुद्द्याबाबत यापूर्वी ९ जानेवारी २०२२ च्या आदेशानुसार लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहणार आहेत. शिथिल करण्यात आलेले निर्बंध आज १ फेब्रुवारी २०२२ पासून अमलात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !